औरंगाबाद : मराठवाड्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधी दुष्काळामुळे होरपळलेला शेतकरी आता अतिवृष्टीमुळे आर्थिक संकटात सापडला आहे. या सर्वाचा गांभीर्याने विचार करुन औरंगाबादमधील शेतकऱ्यांना राज्य सरकारने आर्थिक मदत करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना निवेदन दिले.
या निवेदेनामध्ये मनसेनेच्या वतीने औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट हेक्टरी ५०,००० रुपयांची त्वरित मदत करा, अशी मागणी करण्यात आली आहे. यामध्ये म्हटले की, ‘जिल्ह्यातील आतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहेच तसेच जनावरांचाही यामध्ये जीव गेले आहेत. तसेच घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. म्हणून या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून हेक्टरी ५०,००० रुपयांची त्वरित मदत करावी.’
गेल्या वेळी पडलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामेच अद्याप पूर्ण झालेले नसतांना शेकऱ्यांवर पुन्हा संकट आले आहे. त्यामुळे राज्य सरकारने मदत करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली. या वेळी मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन, राज्य उपाध्यक्ष दिलीप चीतलांगे, दिलीप बनकर पाटिल आदींची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- आलिया भट्टच्या ‘कन्यादान’ जाहिरातीविरुद्ध तक्रार दाखल
- महात्मा गांधींचे विचार सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपा तर्फे राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन
- भारतीय लष्कराच्या गौरवशाली आणि अभिनास्पद कामगिरीचे दर्शन घडवणारे मुंबईत उभे राहणार लष्करी संग्रहालय
- ‘माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग देश सोडून फरार?’, अजित पवारांनी दिले उत्तर
- ‘मुख्यमंत्री किती मिनिटांचा मराठवाडा दौरा करतात हे पाहावे लागेल’, मनसेचा टोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

