Share

आलिया भट्टच्या ‘कन्यादान’ जाहिरातीविरुद्ध तक्रार दाखल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आलिया भट्ट नेहमीच तिच्या ग्लॅमरस अभिनयाने आणि आदगीरीने तिच्या चाहत्यांना घायाळ करत असते. आलिया तिच्या मेकअप, फॅशन, फिटनेस चांगलीच चर्चेत असते. नुकतेच तिने ‘मान्यवर’ या प्रसिद्ध कपड्यांच्या जाहिरातीत आलिया भट्ट कन्यादान प्रथेविषयी बोलत असल्याचे पाहायला मिळाली. मात्र यावरून तिच्यावर संताप व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतर आता तिच्या अडचणीत अधिक वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ‘कन्यादान’च्या जाहिरातीमुळे आता मुंबईत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आलियाने या जाहिरातीच्या माध्यमातून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे. मुंबईच्या लोकक्रांती सामाजिक संघटनेने मान्यवर हा ब्रँड आणि आलिया भटविरोधात तक्रार दाखल केली आहे. संघटनेचे अध्यक्ष व पेशाने वकील असलेले विजेंद्र जाबराने यांनी संबंधित जाहिरात हिंदूविरोधी असल्याचा दावा केला आहे. यामुळे आता आलियाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या  व्हिडीओत आलिया नववधूच्या पोशाखात लग्न मंडपात दिसत आहे. या जाहिरातीदरम्यान तिने विवाह सोहळ्यातील कन्यादानाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मुलीला परक्याचे धन का मानले जाते? असा प्रश्न तिने विचारला आहे. “मुलगी ही दान करण्याची गोष्ट नाही, त्यामुळे कन्यादान नाही कन्यामान,” असा संदेश या व्हिडीओतून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावरून आलियाने हिंदू धर्माचा अपमान केला असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

 

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!