Share

‘अरं बाबा… तुला काही कोरोना होणार नाही, पण तुझ्यामुळे दुसऱ्याला होईल त्याचं काय ?’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गर्दी टाळणं आणि मास्कचा वापर करणं हाच करोनापासून दूर राहण्याचा उत्तम उपाय असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे मास्क न घालताच मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. त्याबद्दल विचारलं असता त्यांनी अजब उत्तर दिलं. त्यांच्या या वक्तव्यामुळं उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे. महापालिका प्रशासन राज ठाकरे यांच्यावर काय कारवाई करणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

मराठी भाषा दिनानिमित्त मनसेनं शाखा-शाखांवर ‘मराठीतून स्वाक्षरी’ कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यापैकी एका कार्यक्रमात राज ठाकरे स्वत: सहभागी झाले होते. मात्र, त्यांनी मास्क लावले नव्हते. याबद्दल पत्रकारांनी राज ठाकरे यांना प्रश्न विचारला. त्यावर, मी मास्क घालतच नाही. तुम्हालाही सांगतो,’ असं ते म्हणाले. राज यांच्या या वक्तव्यामुळं चर्चा रंगली आहे.

राज ठाकरेंच्या या अजब वक्तव्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंना खडे बोल सुनावले आहेत. ‘काही लोक तर सरळ म्हणतात मी मास्क घालणार नाही. अरं बाबा… तुला काही कोरोना होणार नाही. पण तुझ्यामुळे दुसऱ्याला होईल त्याचं काय ?’ अस म्हणत अजित पवारांनी राज ठाकरेंचा समाचार घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!