Share

‘या’ कारणामुळे नारायण राणे खासदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील जनतेला आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. तसेच सगळेच पक्ष आता मोर्चेबांधणी करण्यात व्यस्त आहेत. अशातचं महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे हे येणाऱ्या निवडणुकीत स्वतंत्र लढणार अस चित्र दिसत आहे.

नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा एनडीएचा घटकपक्ष आहे. त्यामुळे भाजपच्या पाठींब्यावर ते राज्यसभेचे खासदार आहेत. परंतु ते येत्या विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणि एनडीएमधील भाजपचा घटकपक्ष शिवसेना यांच्या विरोधामुळे नारायण राणे खासदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.

नारायण राणे यांनी ज्यावेळेस काँग्रेस सोडली त्यानंतर ते भाजपात जातील अशी चर्चा होती. परंतु त्यांच्या प्रवेशाला शिवसेनेनी विरोध केला होता. त्यामुळे नारायण राणे नाराज झाले होते. त्यानंतर त्यांनी भाजपात न जाता महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली आणि ते एनडीएचा घटकपक्ष झाले.

दरम्यान, नारायण राणे यंदाची विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. याची घोषणा त्यांचे पुत्र नितेश राणे यांनी केली आहे. तसेच २०१४ च्या निवडणुकीत पराभव झालेल्या कुडाळ-मालवण मतदारसंघातूनच नाराणय राणे पुन्हा निवडणूक लढवणार आहेत .

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!