Share

ठाण्यात नियम झुगारत मनसेने फोडली दहीहंडी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: कोरोनामुळे राज्यशासनाने यंदा दहीहंडीवर बंदी घातली आहे. मात्र मनसेने यंदाची दहीहंडी फुटणारच असा निर्धार केला होता. त्यानुसार मनसेने ठाण्यात मध्यरात्री दहीहंडी फोडली. मात्र यावेळी मनसेने शासनाचे नियम झुगारून लावले आहेत.

ठाण्यात दहिहंडी फोडू दिली नाही तर, दादरमध्ये करू, असा इशारा मनसेचे संदीप देशपांडे यांनी दिला होता. दरम्यान दहीहंडी साजरी करण्यावरूनच ठाण्याचे मनसे प्रमुख अविनाश जाधव यांना काल पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर देशपांडे यांनी ही भूमिका घेतली होती. त्यानुसार ठाण्यात अखेर मनसेने दहीहंडी फोडलीच. तसेच घाटकोपर येथे राजू सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोपाळकाला साजरा करण्यात आला.

दरम्यान नाशिकमध्येही मनसेने दहीहंडी फोडली आहे. यामुळे मनसेने शासनाचे सर्व नियम झुगारून लावत उत्सव साजरा केला आहे. आता यावर पोलिसांकडून कोणती कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!