🕒 1 min read
मुंबई : गेले ५ महिने कोरोनाने देशासह जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाला प्रातिबंध म्हणून ३१ मे पर्यंत देशभरात कडक लॉकडाऊन करण्यात आला होता. यानंतर, जूनपासुन देशात अनलॉकची घोषणा केल्यानंतर टाळेबंदी टप्प्याटप्प्याने उठवण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील ‘पुनःश्च हरिओम’ म्हणत ‘मिशन बिगीन अगेन’ ची घोषणा केली होती.
आता, जनजीवन पूर्वपदावर येत असताना अनेक सामान्य लोकांना प्रवासासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. आर्थिक फटका सहन करत खाजगी वाहनाने प्रवास करण्यासाठी ई-पासचे बंधन पाळावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी राज्यांतर्गत आणि इतर राज्यांमध्ये जायचे असल्यास ई-पास वा तत्सम परवान्याची गरज नसून प्रवासावरील बंदी उठवण्याची केंद्र सरकारने तयारी दर्शवत निर्णय राज्य सरकारकडे सोपवला होता.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल अनपेक्षित : मंत्री प्राजक्त तनपुरे
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सरकारने ई-पास बंदी बाबत अजूनही कोणता निर्णय घेतला गेला नसून भाजपा व मनसेकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. तर, मनसे आता ई-पास बंदीवर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मनसैनिकांनी व पदाधिकाऱ्यांनी मिळून ई-पासची होळी केली आहे.
पुणेकरांनो मास्क वापरा अन्यथा हजार रुपये दंड भरा!
ई-पास बंदीच्या मागणीवरून मनसेने ऐरोली टोल नाक्यावर आंदोलन केले. यावेळी त्यांनी ई-पासची होळी केली. तसेच, ई-पास मुळे नागरिकांची एजंट मार्फत लूट होत असून विना एजंट पास मिळण्यास अनेक अडचणी येत असल्याचे देखील सांगण्यात आले. यामुळे, कोरोना काळात आर्थिक चंचण निर्माण झाली असतानाच हा आर्थिक फटका देखील सहन करावा लागत असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी देखील ट्विट करून सरकारवर निशाणा साधला होता. “बाहेर राज्यातील लोक गेले आणि आले सुद्धा आणि आपल्याच राज्यातील जनतेला विविध प्रकारचे नियम आणि अटी का? सरकारने आता अव्यवहार्य विचार करणे थांबवावे व जनतेला होणाऱ्या त्रासाचा विचार करून तातडीने ई-पासचा त्रास थांबवून जिल्हा बंदी उठवावी, ज्याप्रमाणे बस प्रवासात ई-पासची आवश्यकता नाही तर मग खासगी वाहन धारकांना याची सक्ती का?” असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सरकारला केला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
