Share

IPL सुरू होण्याआधी ‘या’ संघाविरूद्ध खेळणार टीम इंडिया?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनामुळे अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडलेले आयपीएल 2020 आता लवकरच खेळवले जाणार आहे. या स्पर्धेसाठी युनायटेड अरब अमिराती (UAE) ही जागा नक्की करण्यात आल्याचे आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी सांगितले आहे. स्पर्धेच्या तारखांबद्दल अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही, पण साधारपणे २६ सप्टेंबर ते ७ नोव्हेंबर या काळात आयपीएल 2020चे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे.आयपीएल च्या या हंगामाआधी एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका खेळवण्यात यावी असा दबाव सध्या बीसीसीआयवर टाकला जातोय अशी माहिती आहे.

बीसीसीआयचे समभागधारक आयपीएलच्या आधी एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका खेळवण्यात यावी या मागणीवरून बोर्डावर दबाव टाकत आहेत. काही समभागधारक हे भारतीय क्रिकेट बोर्ड आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड या दोन्ही मंडळांचे समभागधारक आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी आफ्रिका संघाला पसंती असल्याचे बोलले जात आहे.

कोरोना व्हायरसमुळे अनेक आंतरराष्ट्रीय मालिका रद्द झाल्या आहेत. मार्चमध्ये होणारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका रद्द झाल्यानंतर बीसीसीआयला श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्याविरुद्धच्या मालिकाही स्थगित कराव्या लागल्या. त्यात इंग्लंडचा भारत दौराही रद्द होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे भागधारकांकडून बीसीसीआयवर दबाव टाकला जात आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वी टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ट्वेंटी-20 मालिका खेळवावी, असा प्रस्ताव त्यांच्याकडून ठेवला जात आहे.

दरम्यान, तीन टी-२० सामन्यांची भारत-द.आफ्रिका क्रिकेट मालिका होती. त्यातील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, तर इतर दोन सामने कोरोनाच्या तडाख्यामुळे रद्द करण्यात आले होते. तसेच भारतीय संघ हा आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी संघ डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. तत्पूर्वी आयपीएल होणार आहे. त्यासाठी बीसीसीआयच्या करारबद्ध खेळाडूंचे सराव शिबिर अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवर भरवले जाणार आहे.

#cricket : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने जारी केल्या मार्गदर्शक सूचना

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचे पुढील सामने होणार प्रेक्षकांविनाच

एका लग्नामुळे ७ ठिकाणी कंटेन्मेंट झोन, तर नवरदेवाला २५ हजारांचा दंड!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!