🕒 1 min read
मुंबई : येत्या 5 ऑगस्ट रोजी श्री राम मंदीराचा भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या सोहळ्यावर शरद पवार यांनी नुकतीच टिका केली होती. राम मंदीराचे भूमिपुजन करून देशातील कोरोना नष्ट होणार नसल्याची उपहासात्मक टिका शरद पवार यांनी केल्यानंतर या विरोधात आता भाजपा युवा मोर्चा मैदानात उतरली आहे. शरद पवार यांच्या व्यक्तव्याचा भाजपा युवा मोर्चा यांनी निषेध करीत पवार यांच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
श्री राम मंदीर ही देशाची, भाजपाची अस्मिता आहे. मंदीराच्या भूमिपुजनावरून देशात आनंदाचे वातावरण असताना शरद पवार यांनी सदरचे व्यक्तव्य म्हणजे एखाद्या समाजाला खुश करण्याचा प्रयत्न आहे. असा आरोप भाजपा युवा मोर्चाकडून करण्यात आला आहे. शरद पवार यांना श्री रामाची आठवण करून देण्यासाठी त्यांच्या मुंबईतील घरी राज्यभरातून 10 लाख पोस्टकार्ड पाठवण्यात येणार आहेत. भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी याची सुरवात पनवेल येथून केली आहे.
शपथ घेताच उदयनराजेंचा ‘जय भवानी…जय शिवाजी’चा नारा,सभापतींकडून समज…
दरम्यान, अयोध्येतील श्री राम मंदिराच्या भव्य मंदिराच्या बांधकामाच्या संदर्भात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने शनिवारी एक बैठक घेतली. या बैठकीत मंदिराच्या भूमीपूजनासाठी ३ आणि ५ ऑगस्ट या दोन तारखा निश्चित करण्यात आल्या.
निश्चित केलेल्या तारखांपैकी ज्या तारखेला पंतप्रधान उपस्थित राहू शकतील त्या दिवशी पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत भूमीपूजन सोहळा करण्याची योजना ट्रस्टने निश्चित केली होती. पंतप्रधान कार्यालयाने ट्रस्टचा प्रस्ताव मिळाल्यानंतर ५ ऑगस्टला मंजुरी दिली. भूमिपूजनाचा हा कार्यक्रम ३ ते ४ तास चालेल. भूमिपूजनाच्या या कार्यक्रमासाठी काशीवरून पुजारी बोलवण्यात येणार आहेत. ५ ऑगस्टला सकाळी ८ वाजता भूमिपूजनाचा कार्यक्रम सुरू होणार आहे.
या भूमीपूजनावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचं हे ठरवलं पाहिजे. आम्हाला वाटतं की कोरोना संपवला पाहिजे आणि काही लोकांना वाटतं की मंदिर बांधून कोरोना जाईल. लॉकडाऊनमुळे लोकांचं आर्थिक नुकसान होत आहे त्याकडे राज्य, केंद्र सरकारने लक्ष दिलं पाहिजे. आमचे सहकारी खासदार आहेत ते दिल्लीत जाऊन प्रश्न मांडतील, असं शरद पवारांनी म्हटलं.
मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक, उद्या नगर- औरंगाबाद महामार्ग बंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
