मुंबई : संपूर्ण जगाला कोरोनाचा विळखा पडला आहे. चीन, इटली, अमेरिका, स्पेन, इराण इराक, दुबई सारख्या अनेक देशांनी कोरोनापुढे गुडघे टेकले असताना देशाला आशेचा किरण दाखवणारी बातमी समोर येत आहे. भारतातील औषध निर्मितीमधील आघाडीची कंपनी ‘कॅडिला हेल्थकेअर’नं कोरोनावर लस बनवल्याचा दावा केला आहे. कॅडिला हेल्थकेअरचे चेअरमन पंकज पटेल यांनी याबाबत माहिती दिली आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, ‘ कॅडिला कंपनीनं कोरोनावर उपचार करणारी लस तयार केली आहे. सध्या त्याची चाचणी प्राण्यांवर सुरु आहे. त्यातून सकारात्मक रिझल्ट हाती आल्यानंतर पुढच्या तीन महिन्यांमध्ये ही लस माणसांवर उपचाराकरिता उपलब्ध करून दिली जाईल. विशेष म्हणजे कॅडिला ग्रुपकडूनच मालेरीयावारी ओउशाध हायड्रोक्सॉक्लोरीक्विनचीही निर्मिती केली जाते. आपल्याकडे अमेरिकेला पुरवल्यानंतरही हायड्रॉक्सिक्लोरीक्विनचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, हे हायड्रोक्सिक्लोरीक्विन बनवण्यासाठी आपल्याला चीनची गरज नाही. कारण त्यासाठी लागणारा कच्चा माल भारतातच उपलब्ध असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, जगभरात कोरोना व्हायरसवर लस शोधल्याचा दावा आतापर्यंत अनेक देशांनी केला आहे. अशा परीस्थितीत उपचारादरम्यान रूग्णांना सध्या वेगवेगळी औषधे दिली जात आहेत. कोरोनाचे रुग्ण वेगवेगळ्या प्रकारे बरे होत आहेत. अशावेळी कॅडिला ग्रुपचे प्रयत्न यशस्वी झाल्यास ते एक मोठे यश असेल. अशा विश्वाशी पटेल यांनी यावेळी व्यक्त केला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
