🕒 1 min read
मुंबई : भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची प्रकृती बुधवारी रात्री बिघडली. अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना तातडीनं साताऱ्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रक्तदाबाचा त्रास वाढल्यानं त्यांची तब्येत बिघडली. सध्या त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
शिवेंद्रराजे त्यांच्या ‘सुरुची’ बंगल्यावर होते. रात्री उशिरा अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी तातडीने साताऱ्यातील ‘प्रतिभा’ रुग्णालयात दाखल केलं. तिथे त्यांना रक्तदाबाचा त्रास होत असल्याचं निष्पन्न झालं.
शिवेंद्रराजे काल रात्री एका कार्यक्रमासाठी फलटणमध्ये गेले होते. तिथे जेवण झाल्यानंतर ते रात्री साताऱ्यातील ‘सुरुची’ बंगल्यावर पोहोचले. त्यावेळी त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेने साताऱ्यातील प्रतिभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शिवेंद्रराजेंना रक्तदाबाचा त्रास होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर उपचारानंतर, शिवेंद्रराजेंना बरं वाटू लागलं. मात्र सकाळी ते पुन्हा उपचारासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मुंबईतील लीलावती रुग्णालयात शिवेंद्रराजेंवर उपचार होणार आहेत.त्यामुळे आता पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

