🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रात शिवजयंती करण्याबाबत दोन गट असल्याचे पाहायला मिळते. काही जण शिवजयंती तारखेनुसार साजरी करतात तर काही जण ती तिथीनुसार साजरी करतात. महत्वाची बाब म्हणजे तारखेनुसार दरवर्षी शिवजयंती १९ फेब्रुवारीला साजरी केली जाते. परंतु, तिथीनुसार साजरी केली जाणारी शिवजयंती दरवर्षी वेगवेगळ्या तारखेला येते. यंदा तिथीनुसार शिवजयंती आज (२१ मार्च) साजरी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी जे कोणी आपला जन्मदिवस तिथी नुसार सांगेल, त्याला एक लाख रुपये देतो, असे म्हंटले आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना जितेंद्र आव्हाड म्हणाले की,‘हा तारखेचा घोळ काही निवडक इतिहासकारांनी घालून ठेवला आहे. मी इथे उपस्थित असणाऱ्या सर्वांना एक प्रश्न विचारू इच्छितो की, तुमची जन्मतारीख तिथीनुसार कोण सांगू शकेल? त्याला लाख रुपये आत्ता देतो. फक्त शिवाजी महाराजांचा जन्मदिवस तिथीनुसार आणि अक्ख्या देशाचा वाढदिवस हा तारखेनुसार. हा फरक का व कश्यासाठी?’, असा सवाल आव्हाडांनी केला आहे.
तसेच पुढे ते म्हणाले की,‘ज्याला शिवजयंती तिथीनुसार करायची असेल त्याला तिथीनुसार करू द्या आणि ज्याला तारखेनुसार करायची असेल त्याला त्यानुसार करू द्या. परंतु, ३६५ दिवस शिवाजी महाराज हे आपले आदर्श असतात हे कधीही कोणी विसरू नये’, असेही ते यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- नाशिकमधील राखीव सदनिका म्हाडाकडे हस्तांतरीत का करण्यात आल्या नाही?; जितेंद्र आव्हाडांनी दिले स्प्ष्टीकरण
- “सावित्री पुलाची दुर्घटना अजूनही ताजीच…”, सुनील तटकरेंनी केली गडकरींकडे ‘ही’ मागणी
- धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति एकरी मदत देण्याचा राज्य सरकारचा विचार- अजित पवार
- ‘शाबाश मिठू’ मितालीच्या बायोपिकचा ट्रेलर पहिला का; तापसी पन्नूची दर्जेदार ऍक्टिंग!
- “उद्धव ठाकरेजी, तुम्ही लबाडी आणि लाचारीचे सम्राट झालात!” ; भाजपची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
