🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील हे एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात. थोरात व विखे यांचे मतदारसंघ शेजारी-शेजारी असल्यामुळे विविध मुद्द्यावरून त्यांच्यामध्ये राजकीय वाद आहेत. परंतु आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डीमध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे संपर्क कार्यालय सुरू करण्याची जोरदार तयारी सुरू असून ना.थोरात यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे अशी माहिती मुंबई काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रकाश पगारे यांनी दिली आहे.
थोरात-विखे हा वाद अनेक वर्षांपासून आहे. राजकीय वर्चस्वावरून दोघेही एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी दवडत नाहीत. मुंबई काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रकाश पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष मजबूत करण्यासाठी आखणी केली जात आहे. शिर्डी-संगमनेर ते थेट मंत्रालय अशा ऑनलाईन सेवेमुळे तात्काळ तक्रारींचा निपटारा केला जाईल, असे पगारे म्हणाले.
शिर्डीलगत असलेल्या सावळीविहीर ह्या गावात ना.बाळासाहेब थोरात यांचे हे जनसंपर्क कार्यालय उभे राहत आहे. आ.राधाकृष्ण विखे यांच्या शिर्डी मतदारसंघात ना.बाळासाहेब थोरात यांचे जनसंपर्क कार्यालय उभे राहत असल्यामुळे अनेकांच्या भुवळ्या उंचावल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात थोरात-विखे यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- रुग्णसंख्या बघता अरोग्यसेवा वाढण्याची गरज, मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
- ५० सुवर्णकारांना दिला मदतीचा हात…लोकमंगलमुळे जगणे झाले सोपे!
- कल्याण डोंबिवली महानगरपालिका पोस्ट कोविड रिहॅबिलीटेशन सेंटर उभारणार
- अमरावतीच्या आरोग्य व्यवस्थेवर बारीक लक्ष ठेवणाऱ्यांचे अभिनंदन गरजेचे आहे
- आटीपीसीआर लॅब सुरू न झाल्यास आत्मक्लेश आंदोलन करणार या आमदारताई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
