अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. काल दिवसभरात जिल्ह्यात ७७८ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. आता अहमदनगर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३९ हजार ८६० एवढी झाली असून आत्तापर्यंत ३४ हजार ७६९ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. दरम्यान, जिल्ह्यात काल ६४४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.२३ टक्के इतके झाले आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात ६५६ जणांचा कोरोनामुळे बळी गेला असून काल दिवसभरात कोरोनामुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे. रोज ८०० ते ९०० कोरोना बाधित रुग्ण वाढत असल्यामुळे जिल्ह्यातील खासगी रुग्णालये व कोविड सेंटर सध्या फुल आहेत.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १३१, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २९० आणि अँटीजेन चाचणीत ३५७ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ७०, संगमनेर १, राहाता ७, पाथर्डी १, श्रीरामपूर २०, कॅंटोन्मेंट ५, नेवासे ८, श्रीगोंदा ९, पारनेर २, राहुरी २, कोपरगाव १, जामखेड ५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा १०७, संगमनेर ४, राहाता ७, पाथर्डी ४, नगर ग्रामीण ७, श्रीरामपुर ३७, कॅंटोन्मेंट १४, नेवासा १०, श्रीगोंदे ७, पारनेर १७, अकोले ३१, राहुरी ९, शेवगाव १३, कोपरगाव १२, जामखेड १० आणि कर्जत १ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर अँटीजेन चाचणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा २४, संगमनेर १६, राहाता २८, पाथर्डी १३, नगर ग्रामीण २०, श्रीरामपूर ९, कॅंटोन्मेंट २१, नेवासा १०, श्रीगोंदा २३, पारनेर ५२, अकोले २३, राहुरी ३२, शेवगाव ३६, कोपरगाव २५, जामखेड २४ आणि कर्जत १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- अमरावतीच्या आरोग्य व्यवस्थेवर बारीक लक्ष ठेवणाऱ्यांचे अभिनंदन गरजेचे आहे
- आटीपीसीआर लॅब सुरू न झाल्यास आत्मक्लेश आंदोलन करणार या आमदारताई
- विखेंच्या शिर्डीत महसूलमंत्री थोरातांच्या संपर्क कार्यालयाचे लवकरच उद्घाटन
- शेतकर्यांना मदत मिळावी म्हणून ‘या’ आमदारांनी गाठले थेट कृषीमंत्र्यांचे घर
- मागील २५ वर्षे काय केले? मुंबई तुंबली हे शिवसेनेचंच अपयश- राधाकृष्ण विखे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

