चिखली : बुलडाणा जिल्ह्यात २५ सप्टेंबर पयर्ंत शासकीय आटीपीसीआर लॅब सुरू न झाल्यास आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचा इशारा चिखली मतदार संघाच्या आमदार श्वेता महाले यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन दिला आहे.
२२ सप्टेंबर २0२0 रोजी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना दिलेल्या पत्रात नमूद आहे की , गत एप्रिलपासून बुलडाणा जिल्ह्यात शासकीय कोरोना तपासणी लॅब सुरू करावी अशी मागणी करीत आहे. त्यांच्या मागणीनंतर बुलडाणा जिल्ह्यात शासकीय आटीपीसीआर लॅब मंजूरसुद्धा झालेली आहे. परंतु, अद्यापही ती सुरू झालेली नाही.
जिल्ह्यात कालपर्यंत ६,४५१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. १0५ नागरिक यात बळी गेले. २0४६ अँक्टिव्ह रुग्णाची संख्या आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात ५00 ठिकाणी लॅब सुरू झाल्या. बुलडाणा जिल्हा हा जिजाऊंचा जिल्हा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राज्य चालविणार्या सरकारला त्यांच्याच आजोळी लॅब सुरू करता आलेली नाही ही दुर्दैवी बाब आहे. १३ तालुक्यांचा जिल्हा असताना ही जिल्ह्यात कोरोना तपासणी लॅब नसणे ही जिल्हावासीयांसाठी शोकांतिकाच आहे.
जून महिन्यात झालेल्या आढावा बैठकीत तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी सप्टेंबरमध्ये कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तविली होती. त्याप्रमाणे कोरोना रुग्णसंख्या वाढत असतानासुद्धा तपासणी लॅब बुलढाणा जिल्ह्यात न होणे ही शोकांतिका आहे. शासकीय लॅब नसल्याने जिल्ह्यातील नागरिकांचे घेतलेले स्वबचा रिपोर्ट आठ दहा दिवसांनंतर मिळतो. त्यामुळे संसर्ग वाढत आहे.
संशयित रुग्ण रिपोर्ट येईपयर्ंत इकडेतिकडे फिरत राहतो. तो संशयित कोरोना वाहक असल्यास संसर्ग वाढून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे २५ सप्टेंबर पयर्ंत बुलडाणा जिल्ह्यात आटीपीसीआर लॅब सुरू न झाल्यास मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचा इशाराही आ.महाले यांनी दिला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील, असेहीपत्रात नमुद आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- पहिल्यावहिल्या T-२० विश्वचषकाच्या भारत-पाकिस्तान अंतिम सामन्याचा सुवर्णदिवस!
- रुग्णसंख्या बघता अरोग्यसेवा वाढण्याची गरज, मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
- ५० सुवर्णकारांना दिला मदतीचा हात…लोकमंगलमुळे जगणे झाले सोपे!
- कल्याण डोंबिवली महानगरपालिका पोस्ट कोविड रिहॅबिलीटेशन सेंटर उभारणार
- अमरावतीच्या आरोग्य व्यवस्थेवर बारीक लक्ष ठेवणाऱ्यांचे अभिनंदन गरजेचे आहे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

