Share

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले” ; आमदार आशिष शेलार यांची टीका

Published On: 

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले होते. त्यानंतर याप्रकरणी चौकशी समित्या महाविकास आघाडी सरकारने स्थापन केल्या होत्या, याबाबत जलसंधारण विभागाने नुकताच अहवाल दिला असून त्यात जलयुक्त शिवार योजनेत कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचे म्हणत फडणवीसांना क्लीन चीट देण्यात आली आहे. उलट जलयुक्त शिवार योजनेमुळे पीक पेरणी क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या राहणीमानाच्या दर्जात सुधारणा झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

दरम्यान, आता क्लीन चीट मिळाल्यानंतर भाजपनेते चांगलेच आक्रमक झाले असून भाजपने राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली. त्यावेळी आघाडी कडून आरोप करण्यात आले होते की, या योजनेच्या कामात गुणवता नाही, सिंचन क्षमता वाढली नाही, पारदर्शकता नाही मग चौकशी अंती आता तुमच्या जलसंधारण विभागाने काय उत्तर दिली ? जलयुक्त शिवार मुळे संरक्षित सिंचनाची व्यवस्था झाली, नगदी पिकांमध्ये शेतकऱ्यांची कमाई वाढली, लागवडीचा क्षेत्रफळ वाढले, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली, यासाठी जी टेक्नॉलॉजी वापरली होती आणि फोटो जीओ मँपिंग केले गेले त्यात गुणवत्ता आणि पारदर्शकता ठेवली गेली, आणि याच्यामध्ये गावकऱ्यांची सहभागिता होती.

या सगळ्या गोष्टी जलसंधारण विभाग चौकशीअंती बोलत असेल तर केवळ अहंकारापोटी आणि राजकीय द्वेषापोटी तुम्ही या जलयुक्त शिवारला बदनाम केलं. हे सिध्द होते. राजकीय व्देषातून आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा अपमान केला, शेतकऱ्यांचे नुकसान केले, आता तुमचेच दात तुमच्या घशात गेले ना? असा सणसणीत टोला आमदार आशिष शेलार यांनी आघाडी सरकारला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!