Share

आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याची आमदार अंबादास दानवेंची सुचना

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. याला वेळीच रोखले पाहिजे, याकरिता शिवसेनेच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर मी जबाबदार मोहिमेअंतर्गत शिवसेनेकडून कोरोना विषयी जनजागृती संवाददौरा आयोजित केला आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी आज कन्नड तालुक्यातील आठ ते दहा गावांना भेटी दिल्या.

यावेळी तेथील सरपंच व ग्रामसेवक तलाठी पोलीस पाटील शिवसेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला यावेळी त्यांच्या समवेत आमदार उदयसिंह राजपूत, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, अवचित वळवले, तालुकाप्रमुख केतन काजे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक डॉ. राठौड यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी दानवेंनी कोरोना रुग्ण तसेच लसीकरणाबाबत माहिती देखील दिली. कन्नड तालुक्यातील विटखेडा , देवगाव रंगारी ,जळगाव घाट, जवळी, हस्ता ,वाकद ,कन्नड शहर या गावांना भेटी दिल्या.

यावेळी आमदार दानवे यांनी गावात करोना बाधितांची संख्या किती आहे. त्यांच्यावर व्यवस्थित उपचार चालू आहेत का नाही उपचारादरम्यान येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या त्याचप्रमाणे स्थानिक पदाधिकाऱ्यांना कोरोनाचे (covid – 19) चे लसीकरण करून घेण्यासाठी घरोघरी जाऊन जनजागृती करण्याच्या सूचना देखील केल्या आहेत. तसेच प्रत्येक गावात शासनाने सांगितलेल्या सोशल डिस्टन्स पाळणे, मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे, गर्दी न करणे, विनाकारण न फिरणे अशा व इतर नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी नागरिकांसह सर्वांनीच कराव्या अशा सूचना केल्या आहेत.

संवाद दौऱ्यात आमदार दानवे यांनी कोविड सेंटर, शासकीय आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांना भेटी देऊन तेथे प्रशासकीय अधिकारी , डॉक्टर, नर्सेस ,आरोग्य कर्मचारी यांच्याशी संवाद साधला तेथील परिस्थितीचा आढावा घेत आरोग्य यंत्रणा सतर्क राहण्याबाबत सूचना केल्या कुठेही काही अडचण किंवा कमतरता भासल्यास वेळोवेळी त्वरित कळवावे अशा सूचना केल्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!