लातूर : अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ८ दिवस पिकं पाण्यात असल्याने पिवळी पडून पिके कुजली आहेत. तसेच शेंगांमधून कोंबे फुटली आहेत. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मदत द्यावी तसेच शेतीसाठी शेतकऱ्यांनी घेतलेले पीककर्ज व वीजबिल माफ करावे अशी मागणी भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात आमदार अभिमन्यू पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात आमदार पवार यांनी म्हटले की, ‘मागील महिन्यात पावसातील खंडामुळे सोयाबीन पिकाच्या उत्पादनात ५० टक्क्यांची घट झाली होती. आता ऐन शेंगा भरण्याच्या कालावधीत अतिवृष्टीमुळे पिके पाण्यात असल्याने सोयाबीनसह इतर पिके पिवळी पडली आहेत. शेतातील सोयाबीन शेंगामधून कोंबे फुटत आहेत. त्यामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने जास्तीत जास्त आर्थिक मदत देऊन त्यांना मानसिक आणि आर्थिक आधार देण्याची गरज आहे.’
अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ८ दिवस पिकं पाण्यात असल्याने पिवळी पडून पिके कुजली आहे तसेच शेंगांमधून कोंबे फुटली आहेत. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीअंतर्गत मदत द्यावी तसेच शेतीसाठी #ओला_दुष्काळ
1/2 pic.twitter.com/2wcjGlXIsm— Abhimanyu Pawar (@AbhiPawarBJP) September 29, 2021
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या खरीप पिकांचे पंचनामे करुन नैसर्गिक आपत्ती अंतर्गत जास्तीत जास्त मदत मंजूर करण्याची मागणीही आमदार पवार यांनी केली आहे. तसेच खरीप पिकासाठी घेतलेले संपूर्ण कर्ज आणि विजबिल माफ करण्याची मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- …तर आमचाही नाइलाज होईल; जयंत पाटलांनी शिवसेना आणि काँग्रेसला दिला थेट इशारा
- शेतकऱ्यांनी केवळ पीक आधारित उत्पन्न पद्धतीवर अवलंबून न राहता उत्पन्नाचे अन्य स्रोतही शोधावेत – मोदी
- ‘सिद्धू हे दिशाहीन मिसाईल, पंजाबला वाचवायचं असेल तर त्यांनी मुंबईला निघून जावं’
- भावना गवळींना ईडीचे समन्स; 4 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
- शेतकऱ्यांना तातडीनं हेक्टरी 25 हजारांची मदत द्या, ड्रोनद्वारे पंचनामे करा – बावनकुळे


