मुंबई : वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला अखेर विजयी सुर गवसला आहे. वेस्ट इडिंजविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे. मात्र ऑस्ट्रेलियाने मालिका यापुर्वीच गमावली आहे.
नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निर्धारीत २० षटकात ऑस्ट्रेलियाने ६ गडी गमावत १८९ धावांची मजल मारली. मिचेल मार्षने ऑस्ट्रेलियाकडुन ४४ चेंडुत ४ चौकार आणि ६ षटकांरासह सर्वाधीक ७५ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर हेडल वॉल्शने वेस्ट इंडिजकडून २७ धावांत सर्वाधीक ३ गडी बाद केले.
Australia get home by four runs ????
Mitchell Marsh the star of the day with bat and ball in a rollercoaster fourth T20I ????https://t.co/zCt5xIblV3 | #WIvAUS pic.twitter.com/nXAT7vaBWq
— ICC (@ICC) July 15, 2021
प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघाने निर्धारित २० षटकात ६ गडी गमावत १८५ धावांची मजल मारली. यासह ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजवर थरारक विजय मिळवला. अखेरच्या षटकात ११ धावांची गरज असताना वेस्ट इंडिजला ६ धावा करता आल्या. या डावात वेस्ट इंडिजकडुन लेंडी सिमन्सने ४८ चेंडुत १० चौकार आणि २ षटकारासंह ७२ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर मिचेल मार्शने ऑस्ट्रेलियाकडून २४ धावांत सर्वाधीक ३ गडी बाद केले. अष्टपैलु कामगिरीसाठी मिचेल मार्शला सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘टीममधील तरुण खेळाडूंवर दबाव टाकत आहेत’ ; दिग्ग्जाचा मोठा दावा
- काउंटी स्पर्धेत अश्विनचा बळींचा सिक्सर, सरे संघाकडून खेळताना केली कामगीरी
- मोठी बातमी! भारतीय क्रिकेट संघातील एका खेळाडूला कोरोनाची लागण?
- अखेरच्या निर्णायक टी-२० सामन्यात भारतीय महिला संघाचा पराभव, मालिकाही गमावली
- कार्तिकच्या ‘त्या’ वक्तव्यावर पाकिस्तानी क्रिकेट रसिक खुश!


