नवी दिल्ली : अफगाणिस्तानात आता तालिबानची सत्ता असून तालिबानच्या दहशतीमुळे तेथील नागरिक देश सोडून पलायन करीत आहेत. दुसरीकडे अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना पुन्हा मायदेशी आणलेजात आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तानात असलेल्या अल्पसंख्यांक नागरिकांनाही भारतात आणले जात आहे.
अफगाणिस्तानमध्ये अडकलेले भारतीय काबूल विमानतळावर जमा होत असून आता त्यांनी परत मायदेशी आणण्यासाठी दररोज दोन विमानांच्या उड्डाणांना अमेरिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. काबूल विमानतळावर सध्या अमेरिकेचे सैन्य तैनात आहे. त्याच्यामार्फत अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या नागरिकांना पुन्हा भारतात आणले जात आहे.
दरम्यान, सद्यस्थितीस अफगाणिस्तानमधून अमेरिका आणि नाटो सैन्याद्वारे रोज २५ विमाने उड्डाण घेत आहेत. अमेरिकेची मुख्य उद्देश अफगाणिस्तानमध्ये अडकेलेल्या आपल्या नागरिकांना आणि अफगाणिस्तानमधील ज्या नागरिकांना देश सोडायचा आहे, त्यांना वाचविण्यात येत आहे. तसेच सैन्य दलाच्या विमानांद्वारे नागरिकांना काबूल विमानतळावरून बाहेर काढले जात आहे.
अशातच देश सोडून जाणाऱ्या नागरिकांची विमानतळावर गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे विमानतळावर चेंगराचेंगरी होतांना दिसून येत आहे. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर अशाच गोंधळात चेंगराचेंगरी झाली आणि ७ अफगाण नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती ब्रिटीश लष्कराकडून देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘संभाजीनगर’च्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध- आ. अंबादास दानवे
- एकनाथ शिंदेंनी धुडकावले राणेंचे ते वक्तव्य; म्हणाले…
- ‘सरकारमध्ये काँग्रेसची अवस्था प्रचंड वाईट ; स्वाभिमान नावाचा अवयव काँग्रेसमध्ये राहिलाच नाही’
- राज ठाकरेंचा राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप; खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या..
- नार्वेकरांचा बंगला तोडला! सोमय्या म्हणाले, ‘करून दाखविले, आता पुढचा नंबर अनिल परबांचा’

