औरंगाबाद: शिवसेनेच्या माध्यमातून विविध योजनां अंतर्गत शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे होत आहेत. १६८० कोटींची शहर पाणीपुरवठा योजना, शहरातील रस्त्यांची कामे अशा प्रकारे शहरातील वॉर्डावॉर्डात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. संभाीनगरच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. असे प्रतिपादन शिवसेना प्रवक्ते, जिल्हा प्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी केले.
शिवसेना आमदार अंबादास दानवे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे मंजूर झालेल्या निधीतून शहरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू आहेत. शिवसेनेने औरंगाबाद मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकासकामांचा धडाका लावला आहे. औरंगाबाद मध्ये शहरातील वाॅर्ड क्रमांक ५ मधील बेगमपुरा, पहाडसिंगपुरा प्रभागातील आदर्श हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे लोकार्पण आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी संभाजीनगरच्या विकासाबाबत शब्द दिला आहे. आणि तो ते वेळोवेळी पाळत अाहेत. त्यामुळेच सध्या शहराचा विकास झपाट्याने होत आहे. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख विनायक पंडित, उपशहर प्रमुख हिरा सलामपुरे, उद्योग आघाडीचे शहर संघटक गणेश पेरे शिवसेना पदाधिकार्यांची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शिंदेंनी ‘ते’ नारायण राणेंच्या कानात सांगितलं असेल तर मी…’; आशिष शेलार यांचं सूचक विधान
- एकनाथ शिंदेंनी धुडकावले राणेंचे ते वक्तव्य; म्हणाले…
- ‘तेव्हा राज ठाकरे माझ्यासाठी पाऊण तास उन्हात थांबले; पण शिवसेनेचं कोणी फिरकलंही नाही’
- लीड्समध्ये टीम इंडियाला विजयाची हमी ‘हे’ आहे खरे कारण
- महाराष्ट्रावर कोरोनाची तिसरी लाट उसळणार ? ; तज्ज्ञांनी केला मोठा खुलासा

