Share

मामलेदार मिसळचे सर्वेसर्वा ‘मिसळसम्राट’ लक्ष्मण मुर्डेश्वर यांचं निधन!

Published On: 

🕒 1 min read

ठाणे : महाराष्ट्र म्हणलं की वडापाव, मिसळ, भाकरी आणि चरचरीत पदार्थांची मेजवानी समोर येते. सद्या तरुणाईमध्ये देखील परदेशातील पिझ्झा, बर्गरला मिसळचा ट्रेंड तोड देताना दिसत आहे. कोल्हापूर, नाशिक, पुणे, ठाणे अशी काही शहरे मिसळीसाठी प्रसिद्ध आहेत.

या मिसळीला खास ओळख मिळवून देणारे महाराष्ट्राचे ‘मिसळसम्राट’ अशी ख्याती निर्माण करणारे सुप्रसिद्ध ‘मामलेदार मिसळ’चे मालक लक्ष्मण मुर्डेश्वर यांचं आज निधन झालं आहे. ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अल्पशा आजारामुळे गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटद्वारे दुःख व्यक्त केलं आहे. ‘ठाण्यातील मामलेदार मिसळचे मालक लक्ष्मण मुर्डेश्वर यांचं निधन. मुर्डेश्वर यांना कोरोनाची लागण झाल्यानं १५ दिवसांपासून ठाण्याच्या कौशल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. आज दुपारी १२.३० च्या सुमारास मुर्डेश्वर यांचं निधन झालं.’ असं सांगत त्यांनी श्रद्धांजली देखील वाहिली आहे.

मामलेदार मिसळीला आज ७० वर्षांहून अधिक काळ झाला आहे. या मिसळीची ख्याती महाराष्ट्रासोबतच जगभरात देखील आहे. राजकारणी ते कलाकार अशा सर्वांनाच या मिसळीने भुरळ घातल्याचे दिसून येते. या मिसळीला ‘ब्रँड’ बनवण्यामध्ये लक्ष्मण मुर्डेश्वर यांचं मोठं योगदान आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील अनेकदा या मिसळीचा आस्वाद घेतला असून त्यांचे फोटो सोशल मीडियावर चांगेलच व्हायरल होत असतात. भाजप नेते नारायण राणे ५००-६०० प्लेट्सची ऑर्डर द्यायचे व विधिमंडळातील आमदार, सदस्यांसह अधिकाऱ्यांना देखील या मिसळीची मेजवानी द्यायचे. असे अनेक किस्से या मिसळीबाबत प्रसिद्ध आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!