Share

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काँग्रेसने कसली कंबर; निवडणूक व्यवस्थापन समितीची स्थापना 

Published On: 

मुंबई-  राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकांच्या व्यवस्थापनाकरिता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्य स्तरीय निवडणूक व्यवस्थापन समितीची स्थापना केली आहे.

या १३ सदस्यीय समितीच्या अध्यक्षपदी प्रांताध्यक्ष बाळासाहेब थोरात आहेत. तर उपाध्यक्षपदी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष, महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर आहेत. समितीच्या समन्वयकपदी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ऍड. गणेश पाटील आणि सदस्यपदी प्रदेश सरचिटणीस माजी आमदार मोहन जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याशिवाय माजी मंत्री पद्माकर वळवी, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी खा. तुकाराम रेंगे पाटील, प्रकाश मुगदिया, सरचिटणीस राजाराम पानगव्हाणे, इब्राहिम भाईजान, महेंद्र घरत, प्रविण देशमुख, प्रदेश चिटणीस नाना गावंडे, रणजीत देशमुख  यांची नियुक्ती देखील  करण्यात आली आहे.

प्रदेश पातळीवरील या कमिटीसोबतच राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय निवडणूक व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात येणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!