🕒 1 min read
मुंबई: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin gadkri) यांना कोरोनाची लागण झाली आहे. सौम्य लक्षणे जाणवत असल्याने कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे, अशी माहिती गडकरी यांनी ट्विट करत दिली आहे. दरम्यान गडकरी यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही गडकरी यांना कोरोनाची लागण झाली होती.
‘सौम्य लक्षणे जाणवत असल्याने कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. सौम्य लक्षणे असल्याने होम आयसोलेशनमध्येच उपचार घेणार असल्याची माहिती त्यांनी आपल्या ट्विटमध्ये दिली आहे. मी कोरोना संबंधिची सगळी काळजी घेतो आहे. सध्या मी घरात राहूनच उपचार घेतोय. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्या’, असे ट्वीट नितीन गडकरी यांनी केले आहे.
I have tested positive for Covid 19 today with mild symptoms. Following all the necessary protocols, I have isolated myself and I am under home quarantine. I request all those who have come in contact with me to isolate themselves and get tested.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) January 11, 2022
दरम्यान कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेत राज्यात ‘बुस्टर डोस’ ला सुरुवात झाली आहे. मात्र कोरोनाच्या रुग्णसंख्येतही वाढ होताना दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवरच मुख्यमंत्री ठाकरे यांनी निर्बंध कडक केले आहेत. मात्र लॉकडाऊनबाबत अजूनतरी कोणताही विचार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. तर आता कोरोना राजकीय नेत्यांनाही गाठतो आहे. आतापर्यंत राज्यातील १० मंत्री आणि २२ आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नद्दा यांनाही कोरोना संसर्ग झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- “…तर तुमचा मेंदू कुठे आहे तेवढा तपासून पाहा”, पवारांवर केलेल्या टीकेवर आव्हाडांचे प्रत्युत्तर
- रेल्वे सुरक्षा दलात भरतीची ‘ती’ प्रसिद्ध झालेली जाहिरात बोगस?; रेल्वे प्रशासनाने दिली माहिती
- युपीत भाजपला मोठा धक्का; ‘या’ मंत्र्याने केला सपामध्ये प्रवेश
- ‘आता पर्यंत आम्ही तुम्हा खूप…’; न्यायालयाचा परमबीरसिंग यांना दणका
- “पवार साहेबांची अॅलर्जी कोणाला असण्याचे कारण नाही”, पडळकरांना छगन भुजबळांचे प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
