पुणे : मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत आरक्षण देणारा राज्य सरकारचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवला. शिवाय आरक्षणाचा कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारांना नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाचा या निकालाने मराठा समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटल्यात.
सध्या कोरोनाच्या संकटामुळे मराठा समाजाने संयम बाळगावा असं आवाहन राज्याच्या मंत्र्यांकडून केलं जात आहे. तर, लॉकडाऊन संपताच १६ मे रोजी बीड जिल्ह्यात मोर्चा काढणार असल्याची भूमिका मराठा नेत्यांच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा एकदा राज्यातील लॉकडाऊन वाढवण्यात आला असून आता १ जून सकाळी ७ वाजेपर्यंत निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.
दरम्यान, शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी आज पुण्यातील पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. ‘मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत थांबणार नाही, तीव्र आंदोनल करण्यात येईल. मंत्र्यांना फिरू देणार नाही त्यांच्या गाड्या अडवणार. महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही,’ असा आक्रमक इशारा मेटेंनी दिला आहे. तसेच, १८ मे रोजी राज्यभर तहसीलदारांना निवेदन देणार तसेच 5 जूनच्या आसपास मोर्चा काढणार असल्याची भूमिका देखील त्यांनी स्पष्ट केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘लॉकडाऊनचा त्रास झाला, मात्र आता केंद्राचे अधिकारीच सांगतायत त्यामुळे रुग्णसंख्या आटोक्यात आली’
- ‘कोणत्या राज्याला किती ऑक्सिजन दिला ते केंद्र सरकारने पारदर्शकपणे जाहीर करावं’
- ‘केंद्राने महाराष्ट्रात पुरवलेल्या व्हेंटिलेटरमध्ये मोठा घोटाळा’, काँग्रेसचा आरोप
- …तर त्यांना बाजूला घेऊन नाराजी सांगेन; कथित नाराजी नाट्यावर अजितदादांच खटक्यावर बोट !
- ठरलं ! स्पुटनिक व्ही लसीसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

