पुणे : गेल्या वर्षी मार्चमध्ये पुण्यात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची नोंद करण्यात आली होती. यानंतर, शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली होती. गेल्या वर्षाच्या अखेरीस पुण्यातील दैनंदिन जनजीवन सुरळीत होत असतानाच या वर्षी पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने पुण्यासह राज्यात हाहाकार माजवला आहे.
सध्या पुण्यात राबविण्यात येत असलेल्या लॉकडाऊनचे चांगले परिणाम दिसून येऊ लागले आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. पुण्यात वेळीच लॉकडाऊन झाला म्हणूनच रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचे आता केंद्र सरकारचे अधिकारीच सांगत असल्याचं उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.
आज जिल्हा आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, ‘पुण्यात लॉकडाऊन केला म्हणून रुग्णसंख्या आटोक्यात आली, असं केंद्र सरकारचे अधिकारीच सांगतात. पण लॉकडाऊन करताना किती त्रास झाला, हे आम्हालाच माहित. त्यामुळे लोकांनी जरा सबुरीने घ्यावं. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची तयारी सुरु केली आहे. या लाटेत लहान मुलांना लागण होऊ शकते, असा इशारा टास्क फोर्स तसंच तज्ज्ञांनी दिला आहे.’
महत्वाच्या बातम्या
- ‘मला टीम इंडियाचा अभिमान’ ; रवी शास्त्री यांनी केले भारतीय संघाचे अभिनंदन
- सोशल मीडियासाठी काढलेल्या ६ कोटी रुपयांच्या कंत्राटावर अजित पवारांचे मोठे भाष्य,म्हणाले…
- ‘केंद्राने महाराष्ट्रात पुरवलेल्या व्हेंटिलेटरमध्ये मोठा घोटाळा’, काँग्रेसचा आरोप
- …तर त्यांना बाजूला घेऊन नाराजी सांगेन; कथित नाराजी नाट्यावर अजितदादांच खटक्यावर बोट !
- ठरलं ! स्पुटनिक व्ही लसीसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

