पुणे : महाराष्ट्रासह देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा उद्रेक झाला असून या लाटेत आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. रुग्णांना बेड्स मिळत नाहीयेत. राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन आणि इतर आवश्यक औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.
ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली असून अनेक रुग्णांना आपला प्राण गमवावा लागत आहे. केंद्र सरकार राज्यांना लागणारा अधिकचा ऑक्सिजन पुरवठा करत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारने कोणत्या राज्याला किती ऑक्सिजन दिला ते पारदर्शकपणे जाहीर करावं, अशी मागणी केली आहे. ते पुणे जिल्ह्याच्या आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
‘राज्यात तीन हजार मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती करण्याचे राज्य सरकारचे ध्येय आहे. ऑक्सिजन किती आला आणि कुठल्या राज्याला किती देण्यात आला हे पारदर्शकपणे केंद्र सरकारने सांगायला हवं,’ असं अजित पवार म्हणाले आहेत. यामुळे पुन्हा एकदा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा वाद उफाळून येण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘लॉकडाऊनचा त्रास झाला, मात्र आता केंद्राचे अधिकारीच सांगतायत त्यामुळे रुग्णसंख्या आटोक्यात आली’
- सोशल मीडियासाठी काढलेल्या ६ कोटी रुपयांच्या कंत्राटावर अजित पवारांचे मोठे भाष्य,म्हणाले…
- ‘केंद्राने महाराष्ट्रात पुरवलेल्या व्हेंटिलेटरमध्ये मोठा घोटाळा’, काँग्रेसचा आरोप
- …तर त्यांना बाजूला घेऊन नाराजी सांगेन; कथित नाराजी नाट्यावर अजितदादांच खटक्यावर बोट !
- ठरलं ! स्पुटनिक व्ही लसीसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

