पुणे : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यासह १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमीन दस्त, नोंदणी संदर्भात दिशाभूल केल्याच्या आरोपावरुन भोसले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्रातंवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सहदुय्यम निबंधक एल. एम. संगावार यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती. या १४ जणांवर कागदपत्रामंध्ये फेरफारीसह नोंदणी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी चेतन निकम यांनी हवेली दुय्यम निबंधक कार्यालयात अर्ज दिले होते. अर्जाची चौकशी केल्यानंतर त्यामध्ये नोंदणी कायद्याच उल्लंघन केल्याचं आढळून आलं. उल्लंघन केल्याचं उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या १४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता अविनाश भोसले यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. अविनाश भोसले यांची याआधीही ईडीने ४ कोटीची मालमत्ता जप्त केली आहे. विदेशी चलनाप्रकरणातही भोसले यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी करण्यात आली होती. कोट्यवधीच्या एबीआयएल या ग्रुपचे मालक असणारे अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत.
यांच्यावर गुन्हा दाखल
बांधकाम व्यावसायिक अविनाश निवृत्ती भोसले (रा. लॉरी इस्टेट, बाणेर, पुणे), विनोद गोयंका (रा. कर्मयोग, एनएस रोड, जुहू, मुंबई), विकास रणबीर ओबेरॉय (रा. एनएस रोड, जुहू, मुंबई), सिद्धार्थ राजेंद्र मयूर (रा. लकाकी रस्ता, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर,पुणे), सुमन निवृत्ती निकम, नितीन निवृत्ती निकम, देवकी नीलेश निकम, नीलम विकास सूर्यवंशी, अक्षय विकास सूर्यवंशी (सर्व रा. संगमवाडी, पुणे), सपना अभय जैन (रा. आर्यम बंगला, श्रद्धा कॉलनी, जळगाव), कल्पना प्रमोद रायसोनी (रा. जळगाव), विकास विठ्ठलराव पवार, विपुल विठ्ठलराव पवार (दोघे रा. कपिलनगर, खाणगाव रस्ता, लातूर), ज्योती राजेंद्र पवार (रा. शिवकीर्ती, घोरपडी, पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी भारतीय नोंदणी नोंदणी अधिनियम १९०८ कलम ८२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘नितेशजी, सावध राहा! ‘हे’ लोक कधी तुमच्या घरात घुसतील कळणारही नाही’, मलिकांचा सूचक इशारा
- ‘एखादा पेंग्विन कमी पाळा, पण खड्डे बुजवून मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास टाळा!’
- ‘नातेवाईकांचीही चौकशी, त्यांना त्रास देणे हे बरोबर नाही’, गृहमंत्री वळसे पाटलांची प्रतिक्रिया
- ‘खान’ असल्यामुळे नवाब मलिकांचा आरडाओरडा सुरुये का?; नितेश राणे संतापले
- पलटवार! ‘एनसीबीने ज्याला सोडले तो राष्ट्रवादीच्याच जवळचा’; फडणवीसांचा खळबळजनक खुलासा


