मुंबई : सध्या महाराष्ट्राचे राजकारण अभिनेत्री कंगना राणौत भोवती फिरताना दिसत आहे. यात आता कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यात सुरू झालेला वाद आता विकोपाला गेला आहे. मुंबईची पीओकेशी तुलना करणाऱ्या कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर पालिकेने कारवाई केल्यानंतर कंगना राणौत अधिकच संतप्त झाली. याच दरम्यान काँग्रेसनेही कंगनावर जोरदार हल्लाबोल करत निशाणा साधला आहे. ‘कोणी पूर्वीचा अट्टल ड्रग अडिक्ट मुंबईला पाकिस्तान म्हणून महाराष्ट्राचा अपमान करतंय, स्वतःच्या कार्यालयाला राम मंदिर म्हणतंय तरीही भाजपा समर्थन करते? हा तर महाराष्ट्रासकट भगवान श्रीरामाचाही अपमान आहे’ असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
कोणी पूर्वीचा अट्टल ड्रगअॅडिक्ट मुंबईला पाकिस्तान म्हणून महाराष्ट्राचा अपमान करतय, स्वतःच्या कार्यालयाला राम मंदिर म्हणतय तरीही भाजपा समर्थन करते? हा तर महाराष्ट्रासकट भगवान श्रीरामाचाही अपमान आहे. तोंड कोणाचेही असले तरी शब्द भाजपाचेच आहेत.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 10, 2020
काल भाजपा संचालित एक चॅनेलने काही लोकांना जमवून निदर्शने करवणे, मोदी सरकारने तातडीने संरक्षण देणे, यातून सत्तापिपासू भाजपाचे षडयंत्र साफ दिसत आहे. #महाराष्ट्रद्रोहीभाजप ला महाराष्ट्र माफ करणार नाही. गद्दार भाजपा महाराष्ट्रातून साफ होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ!
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 10, 2020
दरम्यान, सचिन सावंत यांच्या या वक्तव्याचा भाजप नेते निलेश राणे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. ‘ कोण बोलतंय हे… हा लुक्का सावंत ज्याला आमदारकीला फक्त १२००० मतं मिळाली, डिपोजिट पण गेलं आणि महाराष्ट्रात काँग्रेस सगळी मिळून ४४ ला आटपली. सावंत विधान परिषदेसाठी धावपळ ठीक आहे पण तुझी लायकी गल्लीत बोलण्याइतकी नाही तू महाराष्ट्रच्या वार्ता करू नको’. अस ट्विट करत निलेश राणे यांनी सचिन सावंत यांच्यावर शरसंधान साधलं आहे.
कोण बोलतंय हे… हा लुक्का सावंत ज्याला आमदारकीला फक्त १२००० मतं मिळाली, deposit पण गेलं आणि महाराष्ट्रात काँग्रेस सगळी मिळून ४४ ला आटपली. सावंत विधान परिषदेसाठी धावपळ ठीक आहे पण तुझी लायकी गल्लीत बोलण्याइतकी नाही तू महाराष्ट्रच्या वार्ता करू नको. https://t.co/D2Ns50HpJV
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 10, 2020
महापालिका कर्मचाऱ्यांनी कार्यालयावर तोडक कारवाई केल्याने संतप्त झालेल्या अभिनेत्री कंगना राणौतने बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली. मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत आज माझे घर तुटले, उद्या तुमचा अहंकार तुटेल, काळाचा महिमा आहे, तो बदलत असतो, असे सांगतानाच बॉलिवूड माफिया आणि उद्धव ठाकरे यांचे गुळपीठ या निमित्ताने उघड झाल्याचा आरोप कंगनाने केला. मुंबईत दाखल झाल्यानंतर कंगनाने आपल्या कार्यालयाची अवस्था व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट करत ही लोकशाहीची हत्या असल्याचे म्हटले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांवर टीका करणारा व्हिडीओ पोस्ट केला होता.
महत्वाच्या बातम्या
मला उध्वस्त करण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले – एकनाथ खडसे
तुकाराम मुंढेंची बदली रद्द ? अद्यापही सस्पेन्स कायम…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

