Share

तिरु प्रकल्पाच्या कालवे दुरुस्तीच्या कामास निधी कमी पडू देणार नाही- राज्यमंत्री संजय बनसोडे

Published On: 

🕒 1 min read

लातूर : उदगीर तालुक्यातील तिरु मध्यम प्रकल्प धरण शंभर टक्के भरले असून तिरु प्रकल्पाच्या कालवे दुरुस्तीच्या कामास निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले. जलपूजनाच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

या वेळी बंद नलीकेव्दारे व एक हौद वितरण व्यवस्थेनुसार साठ्यामधील शेतकऱ्यांसाठी कसे सिंचन करता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी तिरु धरणाचे ‘गोडबोले द्वार’ याची पाहणी केली. तसेच हे व्दार अपोआप उघडत नाही हे त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर संबंधित यंत्रणा कंत्राटदार यांची तातडीने बैठक लावण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या. तसेच हे व्दार तात्काळ दुरुस्ती करण्याच्याही सूचना दिल्या.

तिरुच्या कालव्याचा सर्वे तात्काळ पूर्ण करुन अंदाजपत्रक शासनास सादर करावे तसेच तिरु नदीवरील संरक्षक भिंतीचे तात्काळ बांधकाम सुरु करण्याच्या सूचना दिल्या. उदगीर, जळकोट तालुक्यातील विकास कामे मंजूर झालेली व प्रस्तावित कामांसंदर्भात सर्वांना माहिती करुन दिली. हा प्रकल्प शंभर टक्के भरला असून येत्या रब्बी, उन्हाळी हंगांमासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबतचे आवाहन मोमीन नसीम यांनी केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!