🕒 1 min read
सिल्लोड : सिल्लोड तालुक्यात पाणीसाठा वाढविण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सिंचन बळकटीकरणासाठी तातडीने काम करा असे निर्देश महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बैठकीत दिले. या निर्देशानुसार पर्यायी पाणीसाठ्याचे प्रकल्प अहवाल सादर केले जाणार आहेत. सिंचन भवन येथे गुरुवारी सिल्लोड तालुक्यातील जलसिंचन आढावा बैठक झाली. सिल्लोड तालुक्यात क्षेत्रफळानुसार हक्काचे पाणी तालुक्यास मिळणे आवश्यक आहे. वेळेत नियोजन केल्यास पावसाळ्यात पाण्याचा योग्य साठा होईल.
शेतकऱ्यांसाठी सिंचन व्यवस्था निर्माण करायची आहे. सिल्लोड-सोयगाव तालुक्याचे सर्वेक्षण करून संबंधितांनी पर्यायी पाणीसाठ्याचे प्रकल्प अहवाल सादर करावेत. ज्या माध्यमातून शासनाकडे तालुक्यासाठी पर्यायी पाणीसाठ्याची मागणी करता येईल. तसेच मान्यता मिळालेल्या, मात्र काम सुरु न झालेल्या, मान्यता रद्द झालेल्या इतर धरण प्रकल्पातील तसेच इतर पाणीसाठ्यात मधील पाणी जलसिंचनासाठी वापरण्यासाठी प्रस्ताव सादर करावा असे म्हणाले.
या प्रकल्पाची उंची वाढविण्याचा प्रलंबित प्रस्तावाचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश सत्तार यांनी यावेळी दिले. मध्यम प्रकल्पाच्या धरण पाणीसाठ्याच्या जमिनीची मोजणी करून सीमा निश्चिती करणे, अतिक्रमण हटवून जागा ताब्यात घ्यावी असेही त्यांनी सांगितले. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक के. बी. कुलकर्णी, मुख्य अभियंता डी. बी. तवार, अधीक्षक अभियंता मनोज अवलगावकर यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अजित पवारांनी ठाकरेंना सल्ला द्यावा; ८ दिवस कोकणात जाऊन आपल्या स्टाईलने पंचनामे करून घ्यावेत’
- आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मिळणार ‘उभारी’!
- उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर उस्मानाबादेत कारवाई
- बारावीच्या परीक्षांबाबत लवकरच निर्णय होणार ? केंद्र सरकारची महत्वाची बैठक
- औरंगाबादेत तरुण वर्गच सुपर स्प्रेडर, बाधितांमध्ये ‘एवढ्या’ तरुणांचा समावेश!


