Share

कृषीमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा; राजू शेट्टी आक्रमक

Published On: 

बारामती : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी राज्यात ठीक-ठिकाणी आंदोलन पुकारत आहे. राजू शेट्टींनी गुरुवारी बारामतीत दूध दरवाढीसाठी राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारला होता. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात बारामती नगरपरिषद ते प्रांत कार्यालय असा मोर्चा निघाला होता.

राजू शेट्टी यांनी काढलेल्या मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. परंतु, या मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही. तोंडाला मास्क लावले नव्हते. मोर्चाला परवानगी नाकारली असताना देखील बेकायदा जमाव जमवून घोषणाबाजी आणि भाषणे झाली.

मोठी बातमी: सुरेश रैना ‘आयपीएल’ ला मुकणार; वैयक्तिक कारणांमुळे भारतात परतला

त्यामुळे कोरोना काळ असून देखील जमावाच्या आरोग्याला बाधा होईल, असं कृत्य केल्याची फिर्याद पोलीस कर्मचारी ओंकार सिताप यांनी दिली. त्यावरुन काल बारामती शहर पोलीस ठाण्यात माजी खासदार राजू शेट्टी आणि त्यांच्या अन्य 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशात कोरोनाचा कहर सुरूच! सलग तिसऱ्या दिवशी तब्बल ७५ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद

गुन्हा दाखल झाल्यानंतर एका वृत्तवाहिनीला राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली. “आमच्यासाठी गुन्हे नवीन नाहीत. आणखी एका गुन्ह्याची भर, दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी मोर्चा काढला आहे. मोर्चात गायीचा छळ केल्याचा आरोप हास्यास्पद आहे. कितीही गुन्हे दाखल करा आंदोलन करणार, तसेच ज्यांच्यामुळे शेतकऱ्यांना टोकाचे पाऊल उचलावे लागते त्या कृषीमंत्र्यांवर देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा पोलिसांनी दाखल करावा “, असा घणाघात देख शेट्टींनी यावेळी केला.

सामना अग्रलेख : परीक्षा न घेता पदव्या देण्याची महाराष्ट्र सरकारला हौस नाही!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!