🕒 1 min read
नवी दिल्ली : कोरोना महामारीचे संकट जगभरात घोंघावत असल्याने यंदा दरवर्षीच्या कालावधीमध्ये IPL चे नियोजन करता आले नाही. परंतु टी-२० विश्वचशकाचा संभाव्य अडथळा दूर झाल्या नंतर आयपीएलच्या या मोसमाचे युएईमध्ये नियोजन करण्यात आले आहे.
त्यानुसार, संघ नियमावलींची पूर्तता करण्यासाठी युएईमध्ये दाखल होत आहेत. मात्र, चेन्नई सुपरकिंग्जचा अष्टपैलू फलंदाज सुरेश रैना यंदाच्या आयपीएलला मुकणार आहे. सुरेश रैना संयुक्त अरब अमिरातमधून भारतात परतला आहे. वैयक्तिक कारणाने तो मायदेशी परत आला आहे. चेन्नई सुपर किंग्जने ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली.
देशात कोरोनाचा कहर सुरूच! सलग तिसऱ्या दिवशी तब्बल ७५ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद
“वैयक्तिक कारणांमुळे सुरेश रैना भारतात परतला आहे. आयपीएलच्या या मोसमात तो खेळू शकणार नाही. चेन्नई सुपर किंग्ज अशा काळात सुरेश रैना आणि त्याच्या कुटुंबीयांच्या पाठिशी आहे,” असं ट्वीट चेन्नई सुपर किंग्जच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन करण्यात आलं आहे.
सामना अग्रलेख : परीक्षा न घेता पदव्या देण्याची महाराष्ट्र सरकारला हौस नाही!
Suresh Raina has returned to India for personal reasons and will be unavailable for the remainder of the IPL season. Chennai Super Kings offers complete support to Suresh and his family during this time.
KS Viswanathan
CEO— Chennai Super Kings (@ChennaiIPL) August 29, 2020
दरम्यान, महेंद्रसिंह धोनीपाठोपाठ १५ ऑगस्ट रोजी त्याचा सहकारी सुरेश रैनानेही निवृत्ती जाहीर केली होती. धोनीने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर, सुरेश रैनानेही इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून या प्रवासात मी सुद्धा तुझ्यासोबत आहे, असं म्हणत, निवृत्ती जाहीर केली. धोनी आणि रैना यांनी एकाच दिवशी एकाच वेळी निवृत्ती जाहीर केल्याने, क्रिकेटचाहत्यांना अचानक धक्का बसला होता.
Final year exam: अंतिम वर्ष परीक्षा नियोजनासाठी मंत्री उदय सामंत यांची कुलगुरूंसोबत महत्वाची बैठक
आयपीएलच्या तेरावा मोसमाचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात रंगणार असून कालच, चेन्नई संघाच्या स्टाफला व एका खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे, आता चेन्नई संघ हा अजून १ आठवडा विलगीकरणात राहणार असून १ सप्टेंबरपासून सराव सुरु करू शकणार नाही, यातच सुरेश रैनाच्या परतण्याने संघाला मोठा धक्का बसला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
