नवी दिल्ली : ऑगस्ट महिन्या अखेरीस कोरोनाचा कहर देशात वाढला असून सलग तीन दिवस नव्या कोरोना बाधितांचा आकडा हा ७५ हजारांवर असल्याची नोंद करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार गेल्या २४ तासात तब्बल ७६ हजार ४७२ अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
६५ हजार ५० रुग्णांनी मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे एकूण कोरोनामुक्तांचा आकडा आता २६ लाख ४८ हजार ९९८ वर गेली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ७६.५% वर गेले आहे. तर, देशात काल १ हजार २१ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाले आहे. एकूण ६२ हजार ५५० रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने बळी गेला असून मृत्यूदर हा २.३१% एवढा आहे.
सामना अग्रलेख : परीक्षा न घेता पदव्या देण्याची महाराष्ट्र सरकारला हौस नाही!
देशात एकूण ३४ लाख ६३ हजार ९७२ कोरोना बाधित आढळले असून सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र राज्यात सापडले आहेत. राज्यात काल (दि. २८ ऑगस्ट) रोजी १४ हजार ३६४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील नवे रुग्ण दाखल होण्याची संख्या देखील १४ हजार पारच असल्याने रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. तर, ११ हजार ६०७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून ३३१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Final year exam: अंतिम वर्ष परीक्षा नियोजनासाठी मंत्री उदय सामंत यांची कुलगुरूंसोबत महत्वाची बैठक
राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ७ लाख ४७ हजार ९९५ झाली आहे, यातील एकूण ५ लाख ४३ हजार १७० रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून सद्या १ लाख ८० हजार ७१८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
काँग्रेसच्या ‘त्या’ नाराज नेत्यांची पुढील आठवड्यात महत्वाची बैठक!

