🕒 1 min read
मुुंबई : सिटी बॅंक घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. आमदार रवि राणा यांच्या तक्रारीनंतर ईडीने अडसूळ यांना समन्स पाठवले आहे. त्यानंतर ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी पोहचले होते. दरम्यान प्रकृती खालावल्याने आनंदराव अडसूळ यांना स्ट्रेचवरुन बाहेर आणण्यात आलं आणि नंतर रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यानंतर भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी सिटी कोऑपरेटिव बॅंक बुडवली. ९४ कोटी छोट्या गुंतवणूकदारांचे रुपये गेले. कोट्यावधी रुपये अडसूळ यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. उद्धव ठाकरेंनी गुंतवणूकदारांसाठी काही कारवाई केली नाही. ईडीने अनेक समन्स पाठवल्यानंतरही अडसूळ जात नव्हते. त्यामुळे आज अडसूळ यांना अटक करण्यात आली आहे. छोट्या गुंतवणूकदारासांठी झालेल्या या कारवाईचे मी स्वागत करतो. मंत्री नेत्यांनी जनतेला लुटायचं आणि मग कारवाई झाली तर ती सुडापोटी झाल्याचे म्हणायचे. घोटाळेबाजांविरुद्ध कारवाई होणारचं,’ असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
आनंदराव अडसूळ यांच्यावर सिटी बँकेत ९०० कोटी रुपये भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. याचप्रकरणी आज त्यांना आणि त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांना ईडीने समन्स पाठवलं होतं. सकाळी ७ ते ७.३० वाजण्याच्या सुमारास ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर काही तास त्यांची चौकशी करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
- आनंदराव अडसूळ यांना ज्या प्रकरणात ईडीने समन्स पाठवलं ते प्रकरण नेमकं आहे तरी काय ?
- मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर अपघात, इंदोर-पुणे रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरले
- पश्चिम महाराष्ट्रात नव तंत्रज्ञानाच्या उपयोगातून रस्त्यांचे जाळे निर्माण करणार – नितीन गडकरी
- ‘अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या अवमानाची…’, मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांचे खळबळजनक वक्तव्य
- धर्मांतर रॅकेट : नाव बदलून राहणाऱ्या ‘आतिफ’ला ATSने नाशकातून केली अटक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
