🕒 1 min read
मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी अटक करण्यात आली आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरण महाराष्ट्र सरकारवर सतत निशाणा साधल्यानंतर रिपब्लिक टीव्हीसह अन्य काही वाहिन्यांचा टीआरपी स्कॅमसमोर आला आणि अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ झाली.
आता आणखी एका प्रकरणावरून आज त्यांना अचानक अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईकच्या मृत्यूप्रकरणी पनवेल पोलिसांनी ही कारवाई केली असून पेशाने वास्तूविशारद असलेल्या अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात 5 मे 2018 रोजी आपलं जीवन संपवलं होतं.
यावरून आता राजकारण पेटलं असून भाजप नेते महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत आहेत. अर्नबवर केलेली कारवाई म्हणजे सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे. असे आरोप विरोधी पक्ष करत आहेत. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देणार असल्याचं सांगितले आहे.
ट्विटरवर ट्विट करत त्यांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. ‘ज्यांच्या कुटुंबाचा आधारच हिरावून नेला, देवासमान आई हिरावून नेली, अशा पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देणे हेच कोणत्याही कायद्याचे राज्य असलेल्या शासनाचे कर्तव्य आहे. अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली आहे.
ज्यांच्या कुटुंबाचा आधारच हिरावून नेला
देवासमान आई हिरावून नेली अशा पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देणे हेच कोणत्याही कायद्याचे राज्य असलेल्या शासनाचे कर्तव्य होय.#समर्थनकायद्याचे— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 4, 2020
महत्वाच्या बातम्या
- केदारनाथ मंदिराला बर्फाची शाल ! पहा नेत्रदीपक फोटो
- याला राजकारण ऐसे नाव ! तेजस्वी आणि तेजप्रताप यादव यांची उमेदवारी रद्द होणार ?
- आयपीएल नंतर महिला टी-२० चॅलेंज स्पर्धा देखील होणार यूएईमध्ये
- अर्णब गोस्वामीला कोठडी की जामीन? अलिबाग न्यायालयाकडे देशाचं लक्ष
- बँक ऑफ बडोदाने लागू केलेली शुल्कवाढ एकाच दिवसात मागे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
