Share

मंत्री एकनाथ शिंदेंचा गोपनीय जळगाव दौरा, केवळ एका आमदाराला होती कल्पना

Published On: 

जळगाव : जळगावमध्ये सध्या राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पाचोऱ्यात केलेल्या गुप्त दौऱ्याची जोरदार चर्चा आहे. त्यांनी केवळ एक आमदार आणि एका मंत्र्याला याबाबत माहिती देत अत्यंत गुप्तपणे जळगावला भेट दिली.

एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी पाचोरा येथे धावती आणि गोपनीय भेट दिली. या भेटीत जोशी नावाच्या एका ज्योतिषाकडे शिंदे गेले होते. या ज्योतिषाकडे एकनाथ शिंदे यांनी पूजा केल्याची चर्चा दबक्या आवाजात सगळीकडे सुरू आहे. या गोपनीय दौऱ्यामागे नेमके काय कारण आहे? ही पूजा नेमकी कसली केली? असे विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

पाचोऱ्याचे आ. किशोर पाटील मंगळवारी सकाळीच जळगावमध्ये दाखल झाले. कारण हेलिकाॅप्टरने मंत्री शिंदे येत आहेत हे त्यांना एकट्यालाच माहिती होते. विमानतळावर मग पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनाही बोलावण्यात आले. काही वेळात एका खासगी हेलिकाॅप्टरमधून त्यांचे विमानतळावर आगमन झाले. तिथे थोडा वेळ थांबून त्यांनी गप्पा मारल्या आणि आमदार किशोर पाटील यांच्या सोबत कारने ते पाचोरा येथे रवाना झाले.

पाचोरा येथे प्रभू रामचंद्राचे सुमारे ३०० वर्षे जुने मंदिर आहे. तिथे मंत्री शिंदे आणि आमदार पाटील पोहोचले. काही वेळ मंत्री एकटेच मंदिरात होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यानंतर सर्वांनी रामाचे दर्शन घेतले. पाचाेऱ्याचे नगराध्यक्ष संजय गोहील, मुकुंद बिल्दीकर, उमेश गुंजाळ हेदेखील उपस्थित होते. मंदिरातून ते कारने थेट जैन हिल्सवर आले. तिथे जेवण करून ते लगेच सव्वादोन वाजेच्या सुमारास विमानतळावर गेले आणि तिथून मुंबईला रवाना झाले.

मंत्री शिंदे यांनी सोमवारी रात्री जिल्हाधिकाऱ्यांना या दौऱ्याची कल्पना दिली होती. मात्र, त्या संदर्भात कोणताही प्रोटोकाॅल किंवा बंदोबस्त नको, दौरा जाहीर करू नये असेही निर्देश होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनाही मंगळवारी सकाळी कल्पना देण्यात आली. त्यामुळे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनाही शिंदे यांच्या या दौऱ्याबद्दल वृत्त प्रसिद्ध होईपर्यंत माहिती नव्हते. ही गुप्तता का पाळण्यात आली हे कोणालाही समजले नाही.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!