Share

…अन् मंत्री दत्ता मामा भरणे झाले फोटोग्राफर

Published On: 

मुंबई:- कालपासून विधिमंडळाचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. परंपरेनुसार नागपूरला होणारे हे अधिवेशन यंदा कोरोनामुळं दोन दिवसांचे आणि मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई शहरात थंडी प्रवेश करु लागली आहे. मागील दोन दिवसांपासून शहरात गारवा जाणवू लागला आहे. त्यामुळे वातावरणातील थंडावा आणि मंद हवेतील गारव्याचा अनुभव घेण्यासाठी शहरातील तरुण मरीन ड्राईव्हवर मोठ्या संख्येने जमत आहेत. असेच काही तरुण सोमवारीसुद्धा मरीन ड्राईव्हवर जमले होते. यावेळी दिवसभर अधिवेशन करून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे मरीन ड्राईव्हवर इव्हनिंग वॅाक करण्यासाठी बाहेर आले. इकडे तरुण गप्पांमध्ये दंग होते आणि भरणेंचं लक्ष चालण्याकडे होतं. यावेळी अचानक काही तरुणांनी “ओ काका आमचा एक फोटो काढा की,” असे म्हणत, थेट दत्तात्रय भरणे यांना फोटो काढण्याची विनंती केली.

एवढ्यावरच ते मुले थांबले नाहीत, तर भरणे यांच्या हातात मोबाईल देत तरुणमंडळी फोटोसेशनसाठी रेडीही झाले. यावेळी भरणे यांनी कुठलेही आढेवेढे न घेता तरुणांचे अनेक फोटो काढले. तरुणांच्या विनंतीनंतर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे चक्क फोटोग्राफर झाले. यावेळी भरणे यांनी तरुणांसोबत मनमोकळ्या गप्पा केल्या. त्यानंतर मुलांनीही भरणे यांच्यासोबत अनेक फोटो काढत हा प्रसंग काळाच्या स्मृतीवर कैद केला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!