धुळे : गेल्या पाच महिन्यात कोरोना महामारीने घातलेला कहर व त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात निर्माण झालेली संभ्रमता यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यातील परीक्षांचा गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या नुकसानीची जबाबदारी घेऊन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राजीनामा द्यावा, मागणी अभाविपने केली आहे.
याच मागणीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यामध्ये पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाहनाचा ताफा अभाविपने अडवल्याचे व्हिडिओ सद्या समोर येत आहेत. यानंतर, अब्दुल सत्तार यांच्या सांगण्यावरून या आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचे आरोप देखील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेश मंत्री स्वप्निल बेगडे यांनी लावले आहेत.
“दार उघड उद्धवा, दार उघड”, भाजपा अध्यात्मिक सेलचे २९ ऑगस्टला आंदोलन
आता भाजपाचे आमदार राम सातपुते यांनी देखील ट्विट केले असून, मारहाण करणाऱ्या धुळे पोलिसांवर कारवाईची मागणी देखील त्यांनी केली आहे. “धुळे पोलीसांच्या गुंडागर्दी चा निषेध करावा तितका कमीच आहे.पालकमंत्री अब्दुल्ल सत्तार यांनी विद्यार्थ्यांना भेट दिली नाही म्हणून विद्यार्थ्यानी पालकमंत्र्यांची गाडी अडवली यावर पोलीसांनी आशा प्रकारे विद्यार्थ्यांना मारहाण केली.पोलीसावर कारवाई व्हावी,”असे ट्विट आमदार राम सातपुते यांनी केले आहे.
अभाविपची उदय सामंत यांच्या राजीनाम्याची मागणी, धुळ्यात अडवला अब्दुल सत्तारांचा ताफा
दरम्यान, कोरोनाच्या परिस्थितीमुळे यंदाच्या सत्राच्या परीक्षा रद्द करण्यात आले असल्याने, विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत द्यावे, चालू वर्षाच्या शैक्षणिक शुल्कात ३० % कपात करण्यात यावी तसेच, विद्यापीठांनी लावलेल्या चुकीच्या निकलांचे पुनर्मूल्यांकन करावे अशा मागण्या देखील यावेळी अभाविपतर्फे करण्यात आल्या आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
