अमरावती : मान्सूनचे जिल्ह्यात दमदार आगमन झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. मूळचे शेतकरीच असलेले राज्यमंत्री बच्चू कडू यांनीदेखील विधिवत पेरणीचा शुभारंभ केला.
राज्यमंत्री बच्चू कडू व त्यांच्या पत्नी प्रा.डॉ.नयना कडू यांनी विधिवत बैल तिफण पूजन करून पारंपरिक पद्धतीने पेरणीला सुरूवात केली. कोरोनामुळे आधीच सगळे संकटात सापडले आहे.अशातच सततच्या लॉकडाऊनमुळे खते, बियाणेदेखील उपलब्ध होतील की नाही अशी शंका असतानाच लॉकडाऊन शिथील झाले आणि शेतकऱ्यांमध्ये पेरणीसाठी उत्साह संचारला.
मात्र स्वतः राज्यमंत्री बच्चू कडूदेखील आपल्यासोबत शेतात पेरणी करणार हे बघून शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. यावेळी प्रहारचे ज्येष्ठ पदाधिकारी दिपक भोंगाडे,राहुल म्हाला,संदीप मोहोड,गौरव बोंडे,सतीश मोहोड,मनिष मोहोड,उमेश कपाडे व गोलू ठाकुर आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- मुंबईत जमिनीला अचानक पडला खड्डा काही क्षणात कार बुडाली ;पहा व्हिडीओ
- राष्ट्रीय महामार्ग आष्टामोड ते तिवटग्याळ रस्त्याचे काम संथगतीने; शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी
- कोल्हापूरकरांच्या चिंतेत वाढ; पवार-टोपे घेणार परिस्थितीचा आढावा !
- दुसऱ्या कसोटीत न्युझीलंडचा इंग्लंडवर 8 गडी राखुन विजय; मालिकाही 1-0 ने खिशात
- वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विजय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

