Share

…तर मी भाजपमध्ये जाईल ; राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ !

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्यांत असंतोष आहे. हा कायदा लागू केल्यापासून काँग्रेससह मित्रपक्ष सातत्याने त्याचा विरोध करत आहेत. राज्यातही काँग्रेसने कृषी कायद्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून काँग्रेसची राज्यभरात आंदोलले सुरु आहेत. दरम्यान केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांमध्ये दोन महत्त्वाचे बदल केले तर मी भाजपमध्ये जाण्यास तयार आहे, असा खळबळजनक दावा जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे. जलसंपदा विभाग अहमदनगर येथे आज मंत्री बच्चू कडू आले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे ही उद्घाटन केले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

मंत्री बच्चू कडू पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना ५०% नफा धरून हमी भाव द्यायला पाहिजे आणि शेतमाल खरेदीची हमी सरकारने घेतली पाहिजे. केंद्र सरकारने कृषी कायद्यांमध्ये या दोन सुधारणा केल्यास मी भाजपमध्ये जाऊन त्यांची सेवा करेन. तसेच नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये एनडीए जिंकले आहे. राजकारणात कमी-जास्त चालू असते. राजकारणात कधी हवा असते, तर कधी मंदी असते. तसंही बिहारमध्ये पाहिजे एवढा मोठा विजय भाजपच्या हाती लागला नाही, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे सर्व कल हाती आले असून भाजप व संयुक्त जनता दलाच्या आघाडीला मोठे यश मिळताना दिसत आहे. बिहारमध्ये निवडणुकीसाठी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व्यूहरचना करण्यात आली होती. फडणवीस यांच्या रणनीतीमुळेच बिहारमध्ये भाजपने विजय मिळवला अशी भावना भाजपच्या गोटातून व्यक्त होत आहे. असं असतानाच देवेंद्र फडणवीस देशाचे पंतप्रधान होणार असल्यानेच ते बिहारमध्ये जिंकून आले, अशी मिश्किल प्रतिक्रिया राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!