🕒 1 min read
नागपूर- राज्यातील ५ पदवीधर मतदारसंघांसाठी १ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया होत आहे. आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. ३ डिसेंबर रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. निवडणुकीसाठी 5 नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर आहे. 13 नोव्हेंबरला आलेल्या अर्जांची छानणी होणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची तारीख 17 नोव्हेंबर आहे.
दरम्यान, नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी काँग्रेसकडून अभिजीत वंजारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर यांना काँग्रेसने तिकीट दिलं आहे.काँग्रेसकडून प्राध्यापक बबनराव तायवाडे यांनी नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपला दोन वेळा संधी दिली होती मात्र त्यांना यश मिळालं नाही. त्यामुळे आता नव्या दमाचे अभिजित वंजारी यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपने देखील आपली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पुणे पदवीधर मतदारसंघात संग्राम देशमुख, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात शिरीष बोराळकर, नागपूर पदवीधर मतदारसंघात संदीप जोशी, अमरावती शिक्षक मतदारसंघात नितीन धांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘वारंवार देशात स्वतःचा कचरा करून घेतल्याबद्दल शिवसेनेचं परत एकदा अभिनंदन’
- बिहारच्या विजयात माझा खारीचा वाटा!, कौतुकानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया
- टेलिकॉमनंतर मुकेश अंबानी करणार रिटेल क्षेत्रात प्रवेश ! अॅमेझॉन, वॉलमार्टला देणार टक्कर
- काँग्रेसमध्ये प्रवेशासाठी मोठा ओघ; अनेक नेते संपर्कात – बाळासाहेब थोरात
- आम्ही आमच्या वचनावर ठाम आहोत, नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार : भाजप

