Share

अर्णब सुटला : ‘हा लोकशाहीचा विजय, ठोकशाहीचे थोबाड फुटले’

Published On: 

मुंबई : अन्वय नाईक प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. या प्रकरणी रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला अटक केली होती. उच्च न्यायालयात जामीन दिल्यास ते बेकायदेशीर ठरेल असं म्हणत अंतरिम जामीन नाकारला होता.

यानंतर, अर्णबच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारने केलेल्या कारवाईवर ताशेरे ओढले आहेत. बराच काळ चाललेल्या या सुनावणीनंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने अर्णबच्या सुटकेचे आदेश दिले आहेत, सर्वोच्च न्यायालयाने नुकतंच अंतरिम जामीन मान्य केला आहे. सर्वोच्च न्यायालयात ‘तात्काळ सुनावणी’साठी सूचीबद्ध करून अर्णबच्या जामीनावर आजच सुनावणी घेण्यात आली.

यानंतर, भाजप नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ‘फटाके फोडा रे… महाराष्ट्र सरकारची चांगलीच ‘हजामत’ करून, कोर्टाने अर्णब गोस्वामी यांना जामीन मंजूर केला… अखेर लोकशाहीचा विजय, ठोकशाहीचे थोबाड फुटले.’ असं ट्विट करत भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघात केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!