Share

मंत्री अनुराग ठाकूर आणि रणवीर सिंगचा मल्हारी गाण्यावर जोरदार डान्स, पहा…

Published On: 

मुंबई : राजकीय नेते मंचावरून मजा मस्ती करताना फारच कमी वेळा पाहायला मिळतात. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर नुकतेच एका जाहीर कार्यक्रमात अभिनेता रणवीर सिंह याच्यासोबत मंचावरच ठेका धरताना दिसले. दुबईमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दुबईत भरलेल्या ‘इंडिया एक्सपो’मध्ये ‘द ग्लोबल रीच ऑफ इंडियन मीडिया अॅन्ड एन्टरटेन्मेंट इंडस्ट्री’मध्ये उपस्थितांना हा प्रसंग पहायला मिळाला. सोशल मीडियातून हा हलका-फुलका प्रसंग सर्वांच्याच समोर आला आणि काही वेळातच हा व्हिडिओ व्हायरलही झाला. खुद्द अनुराग ठाकूर यांनीही हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केलाय.

रणवीर आणि अनुराग ठाकूर दोघेही मंचावर उपस्थित असताना रणवीरचा सिनेमा ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमातील एक गाणं वाजू लागलं. साहजिकच लगेचच आपल्या गाण्यावर ठेका धरण्यासाठी रणवीर तयारच होता. त्यानं अनुराग ठाकूर यांनाही आपल्यासोबत नाचण्याचा आग्रह केला. यावर गर्दीनंही त्यांना प्रोत्साहन दिलं. त्यामुळे अनुराग ठाकूर यांनीही रणवीरसोबत ताल धरला.

‘दुबईच्या एक्सपोच्या इंडिया पॅव्हेलियनमध्ये मोठ्या संख्येत लोक सहभागी झाले होते. योग, आयुर्वेद, पर्यटन, टेक्सटाईल, कॉस्मिक वर्ल्ड आणि सिनेमा अशा अनेक भारतीय गोष्टींचं प्रदर्शन इथे पाहायला मिळालं आणि लोकांनाही ते खूप आवडलं. जवळपास १७ लाख लोकांनी इंडिया पॅव्हेलियनला भेट दिली’, असं अनुराग ठाकूर यांनी एएनआयशी बोलताना म्हटलं.

महत्वाच्या बातम्या :

पवार साहेबांनी आडनाव बदलून ‘आगलावे’ ठेवावं – सदाभाऊ खोत

विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याबद्दल प्रस्ताव मांडणार – दिलीप वळसे पाटील

‘पुष्पा’ फेम अभिनेत्री रश्मिका मंदानाचा सेक्सी वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल

शेन वॉर्नला श्रद्धांजली देताना शेवटी सचिननं ‘ती’ गोष्ट केली कबूल; म्हणाला, “त्याच्याविरुद्ध खेळण्यासाठी…”

“ओबीसींच्या खांद्यावर बंदूक ठेवून नको त्या गोष्टी…”- यशोमती ठाकूर

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!