औरंगाबाद : शासकीय रुग्णालयात रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्याची जाहीरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी लॉकडाऊन लागण्याच्या अगोदर ३० मार्च रोजी लॉकडाऊन च्या विरोधात मार्चा काढणार होते. या वेळी दिलेल्या निवेदनात खासदार यांनी विविध मागण्या केल्या होत्या. तर या निवेदनात या वेळी वैद्यकीय पदे भरण्याबाबत खासदार जलील यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात उल्लेख केला होता.
आता इम्तियाज जलील यांच्या मागणीला यश मिळाल्याची भावना एमआयएम कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. तर खासदार इम्तियाज जलील यांनी एक आठवड्यापुर्वी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याकडे लॉकडाऊन करु नका, तसेच हातावर पोट असणाऱ्या कामगारांची जेवणाची व्यवस्था करा, तसेच हातावार पोट असणाऱ्या तसेच काम केले तर उदरनिर्वाह असणाऱ्यांना आर्थिक मदत करा, लॉकडाऊन दरम्यान होणाऱ्या नुकसान भरपाई देण्याची मागणी देखील केलेली होती.
खासदार यांनी केलेल्या मागणीला अनुसरुन आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी ८९९ रिक्त असलेल्या जागा भरण्याबाबत एका दैनिकामध्ये जाहिरात देखील प्रकाशिक झाली आहे. तर आता जर कमी असलेले वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मनुष्यबळ मिळाले तर आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी कोरोना रुग्णांवर योग्य तो तसेच वेळीच उपचार करु शकतील, यात मात्र शंकाच नाही. तसेच लॉकडाऊन लावू नका, या बाबत घेतलेल्या ठोस भूमिकेमुळे प्रशासनाने तसेच राज्य सरकारने ह्या वैद्यकीय अधिकारी पदाच्या भरतीबाबत जाहिरात तर काढली नाही ना ? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.
एकीकडे लॉकडाऊन न लावणे बाबत परभणी, औरंगाबादसह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये नागरिक तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षांनी देखील ठोस भूमिका घेतली आहे. यावर रविवारी मुख्यमंत्री तसेच मंत्रीमंडळातील सदस्य, वरिष्ठ अधिकारी, संचालक, सचिव पदांचे अधिकारी याबाबत चर्चा करत आहेत. तर नुकताच लॉकडाऊन का कडक निर्बंध या वर निर्णय घेण्यात येणार आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. तर औरंगाबाद शहरासह जिल्हामध्ये मात्र वैद्यकीय अधिकारी त्वरीत भरले तर कोरोना रुग्णांच्या उपचाराबाबत देखील त्वरीत पाऊले उचलता येवू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या
- लोकांचा जीव महत्त्वाचा की राजकारण हे भाजप नेत्यांना कळायलं हवं – नवाब मलिक
- कंपाउंडरच्या यशानंतर आता जयंत पाटलांचा चेहरे पाहून कोरोना सांगण्याचा नवा फॉर्म्युला- भाजप
- मोठी बातमी : लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागल्यास सहकार्य करा; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना फोन
- निःशब्द भावनांना बच्चू कडू यांची साथ, राख झालेल्या संसाराला दिला मदतीचा हात
- ‘चंद्रकांत पाटील भित्रा माणूस, त्यांना पुण्यात महिलेच्या जागेवर उभं राहायला लागलं’


