🕒 1 min read
अबुधाबी : दुबई मध्ये सुरु असलेल्या आयपीएलची रंगत आता वाढताना दिसत आहे. सगळेच संघ जिंकण्याच्या हेतूने मैदानात उतरताना दिसत आहेत. आयपीएलच्या 42 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं सलग तीन सामने गमवल्यानंतर पंजाब किंग्जवर दणदणीत विजय मिळवला. पंजाब विरुद्धच्या सामन्यात पराभवाची साखळी तोडत मुंबई इंडियन्स विजयच्या रथावर बसली आहे.
मुंबईच्या टीमनं पंजाबचा 6 विकेट्सनं पराभव केला. मुंबई इंडियन्सनं 136 रनचं आव्हान 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. मुंबईच्या या विजयानंतर पॉईंट्स टेबलमधील रंगत आणखी वाढली आहे. या विजयासह मुंबईन प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या आशाही कायम राखल्या आहेत.
दरम्यान या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने दाखवलेल्या मोठ्या मनाचे कौतुक सर्वत्र होत आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात खेळ भावनेचं चांगलं उदाहरण पाहायला मिळालं. मुंबई आणि पंजाब या दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाची होता. यामध्ये मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा यानं निर्णायक क्षणी खेळ भावना जपली. याच घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
https://twitter.com/CowCorner9/status/1442866753340510211?s=20
झाले असे की, पंजाब किंग्जच्या इनिंगमधील सहाव्या ओव्हरदरम्यान कृणाल पांड्या पंजाब विरुद्ध बॉलिंग करत होता. पंजाबचा ख्रिस गेल स्ट्राईकवर होता. तर केएल राहुल नॉन स्ट्राईकवर होता. कृणालच्या बॉलवर गेलनं सरळ शॉट मारला होता. गेलनं मारलेला बॉल राहुलच्या पायाला लागून कृणालच्या हातामध्ये आला. बॉल पायाला लागल्यानं एक रन काढण्यासाठी क्रिजच्या बाहेर आलेला राहुल थोडा पुढे आला. त्यावेळी कृणालनं लगेच बॉल स्टंपवर मारला आणि रन आऊटचं अपिल केलं.
मैदानावरील अंपायरनं लगेच थर्ड अंपायरकडं इशारा केला. त्यावेळी रोहितनं लगेच हे अपिल मागे घेतलं. राहुल हा पंजाबचा सर्वात यशस्वी बॅट्समन आहे. तो रन आऊट झाला की नाही हे पुरेसं स्पष्ट नव्हतं. या निर्णयाचा मुंबईला फटका बसू शकला असता. पण, रोहितनं निर्णायक क्षणी खेळ भावना जपल्यानं क्रिकेट फॅन्स त्याच कौतुक करत आहेत. यावेळी पंजाब किंग्सचा कर्णधार राहुल यानेही त्याच्या या निर्णयाची दाद दिली आणि त्याला थम्प्स अप केलं.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठवाड्यात पावसाचा हाहाकार, प्रचंड नुकसान; वडेट्टीवारांनी केंद्राकडे केली महत्वाची मागणी
- ‘ईडीला उत्तरं देणं ही माझी जबाबदारी मात्र कुणा वैयक्तिक व्यक्तीला उत्तर देण्यास मी बांधील नाही’
- भुजबळांविरोधातली याचिका मागे घ्या; शिवसेना आमदाराला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीची धमकी
- ८ तासांच्या चौकशीनंतर मंत्री अनिल परब ईडी कार्यालयाच्या बाहेर!
- सातत्याने जावयाचं नाव घेऊ नका, हे काही बरोबर नाही; हसन मुश्रीफ संतापले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

