औरंगाबाद : मुस्लिम आरक्षणासाठी उद्या मुंबईत विराट मोर्चा काढला जाणार आहे. असदुद्दीन ओवेसी (Aassuddin Owaisi)यांच्या उपस्थितीत मुंबईत विराट सभेचेही आयोजन करण्यात आल्याची माहिती शुक्रवारी (दि.१०) खासदार इम्तियाज जलील(Imtiyaz Jaleel) यांनी दिली. त्याचबरोबर या मोर्चाला औरंगाबाद शहरातून सुरुवात होणार आहे. राज्यात एकीकडे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतांना आता मुस्लिम आरक्षणावरूनही खडाजंगी होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
मुस्लिम आरक्षणासाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चाला औरंगाबाद शहरातून सुरुवात होईल. तर राज्यभरातून विविध ठिकाणाहून अनेक कार्यकर्ते मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. धनगर आरक्षण असे अनेक प्रश्न प्रलंबित असतांनाच यामध्ये आता मुस्लिम आरक्षणाचीही भर पडल्याने राज्य सरकारची डोकेदुखी वाढणार आहे. या मोर्चासाठी मुंबई पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. मात्र तरीही मुस्लिमांचा हा विराट मोर्चा निघणार असल्याची माहिती औरंगाबादचे खासदार जलील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मात्र अजून पर्यंत एमआयएमने मुंबईतील सभेचे ठिकाण जाहीर केलेले नाही. याबाबत मोठ्या प्रमाणावर गोपनीयता बाळगण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर विराट मोर्चा बाबत सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्सुकता निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर ऑमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात नवीन नियमावली लागू करण्यात आलेली असतांनाच राजकीय सभांना देखील शासनाकडून बंदी घालण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर आता हा विराट मोर्चा निघणार कसा? त्याचबरोबर पोलिसांच्या कारवाईकडे ही सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अभिनेत्री अथिया शेट्टी वापरते ‘या’ क्रिकेटपटूचे कपडे! ; फोटो व्हायरल
- क्रांती-समीर वानखेडेंनी गुगल,ट्विटर आणि फेसबुकला खेचले न्यायालयात
- ‘भ्रष्टाचार, खंडणी, वसुली यापलिकडे मविआचे कुठलेच कर्तृत्व नाही’
- …’शाहजादे’ राज्य करत आहेत; कोहलीच्या कर्णधार पदावरून राऊतांची प्रतिक्रिया
- नितेश राणेंचं संजय राऊतांना ओपन चॅलेंज; हिम्मत असेल तर….

