Share

दूध उत्पादन महासंघ निवडणुकीचा प्रचार थांबला; पुन्हा येणार का बागडेंची सत्ता? सर्वपक्षीयांचे लक्ष!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : जिल्ह्यातील दूध उत्पादन महासंघ निवडणुकीसाठी सुरू असलेला प्रचार गुरुवारी थांबला. आता सर्वांचेच लक्ष मतदानाकडे लागलेले आहे. २२ जानेवारी रोजी मतदान पार पडणार आहे. मात्र जी जागा बिनविरोध व्हायला हवी होती, ती जागा बिनविरोध होऊ शकलेली नाही. भाजप आमदार तथा जेष्ठ नेते हरिभाऊ बागडे(Haribhaou Bagade) यांची जागा बिनविरोध व्हावी यासाठी सर्वपक्षीयांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. मात्र याव्यतिरिक्त इतर ७ जागा बिनविरोध झाल्या.  मात्र पुन्हा बागडेंची सत्ता येणार का? याकडे सर्वपक्षीयांचे लक्ष लागलेले आहे.

दूध उत्पादक संघात राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसून येत आहेत. उत्पादन संघातील अनेक संचालक याठिकाणी अनेक वर्षांपासून आहेत. आता नव्यांना संधी दिली पाहिजे, अशी भूमिकादेखील घेतली जाऊ शकते. सध्या या ठिकाणी सर्वपक्षीय संचालक मंडळ कार्यरत असले तरी राज्यात झालेल्या सत्ता बदलामुळे दूध उत्पादक संघातही तसे बदल येणाऱ्या काळात होऊ शकतात. मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बिनविरोध आणण्यात यश आले आहे. सात जागांपैकी आमदार हरिभाऊ बागडे, माजी संचालक गोकुळ सिंग राजपूत, संदीप बोरसे, कचरू डिके, शीला कोळगे, अलका डोणगावकर, पुंडलिकराव काजे यांचे एक पॅनल आहे.

यासंदर्भात झालेल्या शेवटच्या बैठकीत कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, हरिभाऊ बागडे यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे देखील उपस्थित होते. यावेळी सत्तार म्हणाले की, बागडे यांनी दूध संघात अनेक चांगली कामे केली आहेत. तसेच भुमरे म्हणाले की मराठवाडा दूध संघाने एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यामुळे दूध संघ वाचवण्यासाठी बागडेंशिवाय पर्याय नसल्याचेही ते म्हणाले. यावेळी काँग्रेसचे रामुकाका शेळके, श्रीराम शेळके, सुनील शिंदे, रमेश डोणगावकर, बाजार समितीचे माजी सभापती राधाकिसन पठाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!