🕒 1 min read
पुणे- अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी समस्त हिंदु अाघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबाेटे यांची धडपड सुरूच आहे. कोरेगाव-भीमा प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी मिलिंद एकबोटे यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. काेरेगाव-भीमा येथे एक जानेवारी राेजी दाेन गटात दंगल घडल्यानंतर एकबाेटे यांच्यावर शिक्रापूर याठिकाणी अॅट्रासिटी व इतर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात अाला आहे.
दैनिक दिव्य मराठीने दिलेल्या वृत्तानुसार,जामिनासाठी मिलिंद एकबोटे यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. मिलिंद एकबाेटे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर याप्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा याकरिता त्यांनी, वकीलांमार्फत पुणे सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला हाेता. मात्र, न्यायालयाने दाेन्ही बाजूंचा युक्तिवाद एेकून घेत एकबाेटे यांचा अर्ज फेटाळून लावल्याने, त्यांच्या समाेरील अडचणीत वाढ झाली अाहे. मिलिंद एकबाेटे यांना अटक करण्यासााठी पाेलिसांना मार्ग माेकळा झाला असला तरी मुंबर्इ उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी एकबाेटे यांनी अर्ज केला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

