सांगली : म्हसोबाला नाही बायको आणि सटवाईला नाही नवरा, अशी महाविकास आघाडी तीन पक्षांची अवस्था झाली आहे. एकमेकांना ॲडजस्ट करून घेतात. आदित्य ठाकरे यांचा दौरा म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेसने पुरस्कृत केलेल्या कार्यकर्त्यांचा दौरा आहे, अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. शिवसेनेचा दौरा आदित्य ठाकरे करतात. त्यामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अग्रेसर आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गळ्यामध्ये भगवा मफलर टाकतात. मग, शिवसेनेच्या नावानं घोषणा देताहेत.
उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचा मी जाहीर निषेध करतो. आमच्यावरही बरेच वेळा हल्ला करण्यात आला. आमच्यावर हल्ला झाला तेव्हा शिवसेना, राष्ट्रवादीवाले वेगळ्या पद्धतीनं मांडणी करत होते. उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. पुण्यात खूपकाही शिवसैनिक नाहीत. ते बऱ्यापैकी राष्ट्रवादीची लोकं आहेत. आदित्य ठाकरेंची सभा होते, तिथं पवारांची माणसं उपस्थित असतात, असा आरोपही पडळकर यांनी केलाय.
महत्वाच्या बातम्या :
- Asia Cup 2022 : आशिया चषकात विराट कोहली देऊ शकतो भारतासाठी सलामी; ‘या’ माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य!
- IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यावर्षी दोन वेळा एकमेकांविरुद्ध भिडणार, ‘अशा’ आहेत सामन्यांच्या तारखा!
- Cm Eknath Shinde Meets Prakash Amte | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली डॉ प्रकाश आमटे यांची भेट
- Uddhav thackeray | “… पण आता तर शिवसेना संपविण्याचाच प्रयत्न”; उद्धव ठाकरेंची नड्डा यांच्यावर टीका
- China-Taiwan Conflict | तैवान दुसरे युक्रेन बनणार? चीनने चारही बाजूने घेरले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

