पुणे : म्हाडाकडून विविध पदांच्या भरतीसाठी रविवारी आयोजित केलेली परीक्षा अचानक रद्द करण्यात आली यामुळे परीक्षार्थीं संतापले आहेत. ‘काही तांत्रिक कारणास्तव परीक्षा रद्द करण्यात आली’ असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रात्री उशिरा ट्विटरला व्हिडीओ शेअर करत सांगितले आहे.
पेपरफुटी प्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाला 6 आरोपींना पकडण्यात यश आले आहे. या आरोपींना न्यायालयामध्ये हजर केले असता या सर्व आरोपींना न्यायालयाने 18 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी माहिती दिली आहे.
म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फोडल्या प्रकरणी औरंगाबाद, जालना, बीड, पुणे, ठाणे या भागात आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली. त्यामध्ये औरंगाबाद येथील टार्गेट करिअर पॉईंट या संस्थेचे संचालक अजय चव्हाण आणि सक्षम अकॅडेमीचे संचालक कृष्णा जाधव, अंकित चनखोरे, पुण्यामध्ये राहणारे संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ, डॉ. प्रितीश देशमुख या सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्या आरोपींकडे काही पेपर, पेन ड्राईव्ह आदी साहित्य आढळून आले आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.
दरम्यान, काहींचे मोबाइल नंबर देखील मिळाले आहेत. या कारवाईमधून आणखी नावे समोर येण्याची शक्यता असल्याने आज आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली, असेही अभिनव गुप्ता यांनी सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- म्हाडा पेपरफुटीची सीबीआय चौकशी करा; फडणवीसांची मागणी
- ‘पवारसाहेबांचे नाव घेतल्याशिवाय देशाचा आणि राज्याचा इतिहास लिहिता येणार नाही’
- जितेंद्र आव्हाडांचा विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न; केली महत्वाची घोषणा
- ‘आव्हाडसाहेब, जमत नसेल तर मंत्रिपद सोडा, कुंपणच शेत खात असेल तर….’
- गरिबातल्या गरीब फाटक्यातल्या फाटक्या माणसापर्यंत गोपीनाथ गड पोहोचवण्याचा संकल्प! पंकजा मुंडेंचे समर्थकांना आवाहन

